शाळांसाठी व्यवसाय शिक्षणाचे मंगळवारी पुण्यात प्रदर्शन
शिक्रापूर, ता. २० ः शालेय स्तरावर व्यवसाय शिक्षण हा विषय राबवू इच्छिणाऱ्या शाळांसाठी मार्गदर्शक ठरेल असे यशस्वी प्रकल्प प्रदर्शन विज्ञान आश्रम (पाबळ, ता. शिरूर) यांनी पुण्यात मंगळवारी (ता. २४) आयोजित केले आहे. पूर्णत: मोफत असलेल्या या प्रदर्शनात संस्थेने गेल्या वर्षभरात ५० शाळांमध्ये राबविलेल्या यशस्वी प्रकल्प प्रयोगांचे प्रदर्शन केले जाणार असल्याची माहिती संस्थेचे मुख्य संचालक डॉ. योगेश कुलकर्णी यांनी दिली.
जागतिक स्तरावर रोजगाराभिमुख शिक्षणावर भरीव काम करणारी संस्था असलेल्या विज्ञान आश्रमने मागील वर्षभरात एससीईआरटीच्या परवानगीने इयत्ता सहावीपासून व्यवसाय शिक्षण राबविण्याचा प्रयोग तब्बल ५० शाळांमध्ये राबविला. या प्रदर्शनातही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून तयार केलेले प्रकल्प सादर केले जात असून राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० व राज्य अभ्यासक्रम आराखडा यांनुसार व्यवसाय शिक्षण कसे राबवायचे यासाठी आवश्यक ते सर्व प्रयोग येथे मांडण्यात येणार आहेत. हे प्रदर्शन संस्थाचालक, विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांच्यासाठी खुले असेल. जे. पी. नाईक सेंटर फॉर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, कोथरूड (पुणे) येथे सकाळी १०.०० ते दुपारी २:३० या वेळेत हे प्रदर्शन असणार आहे.
वेळ:
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

