शिक्रापूरच्या दोन जिल्हा परिषद शाळांना अ+ श्रेणी

शिक्रापूरच्या दोन जिल्हा परिषद शाळांना अ+ श्रेणी

Published on

शिक्रापूर, ता. १ ः राज्य सरकारच्या शाळा गुणवत्ता मुल्यांकन आराखड्यानुसार येथील कोयाळी पुनर्वसन व वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळांना अ+ श्रेणी प्राप्त झाल्याची माहिती सरपंच रमेश गडदे व उपसरपंच प्रकाश वाबळे यांनी दिली.
या दोन्ही शाळांनी शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मुल्यांकन आराखड्यात राज्यातील तब्बल १ लाख २ हजार ६७५ शाळांनी सहभाग घेतलेला असताना त्यातील केवळ १० हजार ७१२ शाळांची शासनाच्या वतीने या मुल्यांकन आराखड्यामध्ये निवड करण्यात आली होती. या शाळांपैकी ४२९ शाळांना शासनाकडून अ+ श्रेणी देण्यात आली. यात पुणे जिल्ह्यातील अठ्ठावीस शाळांचा सहभाग असून शिरूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद शाळांना अ+ श्रेणी प्राप्त झाली.
दरम्यान दोन्ही शाळांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तालुका शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे, पंचायत समितीच्या सदस्य रामराव सासवडे आदींनी अभिनंदन केले असून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने दोन्ही शाळांमधील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सर्व सदस्यांचा लवकरच जाहीर सत्कार करणार असल्याची माहिती सरपंच गडदे व उपसरपंच वाबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com