एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेस
शिक्रापूर आगारात प्रारंभ

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेस शिक्रापूर आगारात प्रारंभ

Published on

शिक्रापूर, ता. ४ ः शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एसटी स्थानक येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी सुरू केलेल्या स्मार्ट कार्ड अर्थात नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या नवीन डिजिटल प्रणाली योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या स्मार्टकार्डमुळे आता एसटी महामंडळाच्या सर्व प्रवासी सवलतीच्या योजना लाभार्थ्यांना अगदी सहजपणे मिळणार असून, तिकीटासाठी सुट्ट्या पैशांचा त्रासही पूर्ण संपणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक दिलावर तांबोळी यांनी दिली.
या स्मार्ट कार्डमध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना, दिव्यांग नागरिक योजना, शालेय विद्यार्थी पास आदी सवलतींच्या योजनेचा लाभ घेण्याची व्यवस्था आहे. नवीन डिजिटल प्रणालीचा औपचारिक प्रारंभ जिल्हा परिषद सदस्या मोनिका हरगुडे व सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते येथील स्थानकात करण्यात आला. शिक्रापूरकरांच्या मोठ्या प्रयत्नाने येथील एसटी स्थानक सुधारणा खात्यासह स्थानिक नागरिकांच्या मदतीने झाल्यापासून येथील स्थानकात प्रवाश्यांची संख्याही वाढली आहे. याच पार्श्वभूमिवर एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवाश्यांसाठीच्या योजना एकाच डिजीटल कार्डवर अ‍ॅक्टिव करण्यात आल्या, त्याचे औपचारिक वाटप कार्यक्रम नुकताच येथे संपन्न झाला.
यावेळी उपसरपंच प्रकाश वाबळे, मंगल सासवडे, सुभाष खैरे, वाहतूक नियंत्रक माधव मुंडे, दिलावर तांबोळी, शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुपचे स्वप्नील मांढरे, दिनेश मांढरे, सतीश सासवडे, गणेश सासवडे, स्वप्नील मंहाजन, तुषार आळंदीकर, केदार कुंटेवाड, सूरज शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील मांढरे यांनी, तर वाहतूक नियंत्रक माधव मुंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com