सणसवाडीत बेकायदा अतिक्रमण फलक
शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथील ३३ गुंठे शेती क्षेत्रावर बेकायदा अतिक्रमण करून या जमिनीच्या व्यवहारासाठी स्वतःचा मोबाइल नंबर टाकून संपर्क करण्याचा फलक लावण्यावरून शिक्रापूर पोलिसांनी सणसवाडीतील रामदास दरेकर यांच्या गुन्हा दाखल केला आहे. मंदार श्रीनिवास मुदगल (वय ५३, रा.सुंदर व्हिला, प्रभात रोड, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. मुदगल हे त्यांच्या सणसवाडी येथील जमीन गट नं.९१३/७ मध्ये आले असता त्यात बेकायदा अतिक्रमण करून जमिनीच्या व्यवहारासाठी एक जाहीर नोटीस लावलेली होती, असे तक्रार अर्जात नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक एस. व्ही. होळकर हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

