''घोडगंगा''चे ज्येष्ठ संचालक दादापाटील फराटे अपात्र
शिक्रापूर, ता. ५ : न्हावरा (ता. शिरूर) येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दादासाहेब गणपत फराटे यांना प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी अपात्र ठरविले आहे. या निर्णयामुळे फराटे यांना पुढील पाच वर्षे कोणतीही सहकारी निवडणूक लढवता येणार नाही, असा निकाल देण्यात आला आहे.
दिलीप आनंदराव फराटे यांनी १९ मार्च २०२५ला दादासाहेब फराटे यांच्या निवडीला आव्हान देणारी तक्रार साखर आयुक्तांकडे केली होती. फराटे हे २०२२ च्या निवडणुकीत निवडून आले होते, मात्र नामांकनाच्या वेळीच ते अपात्र असल्याचा दावा तक्रारदाराने केला होता. सहायक निबंधक, विभागीय सहनिबंधक आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेले आदेश पुरावे म्हणून तक्रारदारांनी सादर केले होते. विशेषतः मुंबई उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२५ला दिलेल्या आदेश आणि महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदींचा आधार घेण्यात आला. तसेच दरम्यान, या प्रकरणातील सुनावणीदरम्यान दादासाहेब फराटे किंवा त्यांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली नाही, त्यामुळे नीलिमा गायकवाड यांनी ही कारवाई केली.
घटनाक्रम
कारखाना निवडणूक : ०६ नोव्हेंबर २०२२ला दादासाहेब फराटे संचालक म्हणून निवडून आले
न्यायालयीन प्रक्रिया व प्रकरणाचा निकाल : २४ जानेवारी २०२५ला उच्च न्यायालयाने त्यांची अपात्रता कायम ठेवली
दिलीप आनंदराव फराटे यांचे आक्षेप : १९ मार्च २०२५ला प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडे दाखल.
याप्रकरणी साखर सहसंचालकांनी घेतलेल्या सुनावण्या : ३० जून २०२५, ३० जुलै २०२५, २ सप्टेंबर २०२५ व १६ सप्टेंबर २०२५
अंतिम आदेश : २७ फेब्रुवारी २०२६ प्रादेशिक सहसंचालकांनी संचालक पद रद्द केल्याचा आदेश दिला
अपात्र निकालाची कुठलीही प्रत मला मिळालेली नाही. माझे वकील ॲड. इनामदार सप्टेंबर २०२५ला सुनावणीला उपस्थित होते, त्यांनाही पुढील सुनावण्यांची माहिती दिली गेली नाही. अर्थात आम्ही संचालक मंडळ अस्तित्वात आल्याबरोबर जो कारखाना थेट बंद पडला आहे, त्यातील सर्वच संचालक मंडळ अपात्र आहे. त्यामुळे मी एकटा अपात्र ठरवून नेमके साध्य काय. तरीही मी कायदेशीर दाद मागणार आहे.
- दादापाटील फराटे, अपात्र ज्येष्ठ संचालक, घोडगंगा, न्हावरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

