शिक्रापूर बाजार, वाहनतळ लिलाव रद्द

शिक्रापूर बाजार, वाहनतळ लिलाव रद्द
Published on

शिक्रापूर, ता. ११ : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या आठवडे बाजार व वाहनतळाचा लिलाव करण्याचा निर्णय तब्बल ११ वर्षांनी घेण्यात आला होता. मात्र, या लिलाव प्रक्रियेबाबत काही तक्रारी आल्याने बुधवारचा (ता. ११) लिलाव रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामपंचायत पदाधिकारी व काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्रापूर ग्रामपंचायतच्या वतीने आठवडे व दैनंदिन बाजार तसेच बाजार पार्किंगची लिलाव प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता व तशी जाहिरात देऊन लिलाव प्रक्रिया राबविण्याचेही ठरले होते. यापूर्वी ग्रामपंचायतीने २०१५ मध्ये दोन्ही लिलाव घेतले होते. संबंधित ठेकेदाराने लिलाव घेऊन तो अर्धवटच सोडून दिल्याने पुढील वसुली थेट ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केली जात होती. मात्र, नव्याने वरील लिलाव करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने प्रक्रिया राबविली असता, काही लेखी स्वरुपात तक्रारी आल्याने बुधवारचा लिलाव रद्द करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली.
दरम्यान, चेतन कड, विशाल लोखंडे, अक्षय मांढरे, बाळासाहेब चव्हाण, महेश कळमकर व शुभम चव्हाण यांनी दैनंदिन व आठवडे बाजार लिलाव तर पार्किंग लिलावात शक्ती केंडे, तुषार आळंदीकर व नितीन डूबल यांनी अनामत रक्कम ठेवून सहभाग नोंदविला होता. मात्र, लिलावच रद्द झाल्याने सहभागी इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली.

पंचायत समितीकडून मार्गदर्शन मागविले
शिक्रापूर ग्रामपंचायतीने पूर्वीप्रमाणेच दोन्ही लिलावांसाठीची प्रक्रिया राबविली होती; मात्र काही लेखी तक्रारी आल्याने आम्ही सर्व लिलाव प्रक्रिया अहवाल शिरूर पंचायत समितीकडे तातडीने पाठविला. लिलाव प्रक्रिया होणारच आहे; मात्र पंचायत समिती याबाबत जी मार्गदर्शक सूचना देतील त्यानुसार लिलाव प्रक्रिया राबविली जाईल, असे ग्रामपंचायतीकडून स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com