कोरेगाव येथील खंडणीखोर भरत गव्हाणे याला कोठडी
सणसवाडी, ता. ६ : कंपनीच्या कंत्राटात हिस्सा आणि हप्त्यासाठी कंत्राटदाराला मारहाण करणाऱ्या कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भरत शहाजी गव्हाणे याला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली. शिरूर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती फौजदार महेश डोंगरे यांनी दिली.
सणसवाडी-कोरेगाव भीमा हद्दीवरील ‘के मेटल प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीत २५ फेब्रुवारी रोजी भरत गव्हाणे याने बेकायदेशीरपणे प्रवेश करून सुपरवायझर हेमंत शर्मा, अविनाश घुगे आणि दीपक कोकाटे यांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘कंत्राटात हिस्सा द्या किंवा महिन्याला हप्ता द्या, अन्यथा येथे राहू देणार नाही,’ अशी धमकी त्याने दिली होती.
याप्रकरणी सुरक्षा सुपरवायझर रामदास कुंडलिक धुमाळ यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून गव्हाणे फरारी होता. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने शोध घेऊन त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

