शिक्रापुरात चोरीच्या उद्देशाने 
फिरणाऱ्या दोघांना अटक

शिक्रापुरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोघांना अटक

Published on

शिक्रापूर, ता. १२ : शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात चोऱ्यांचे सत्र रोखण्यासाठी गस्तीवर असलेल्या शिक्रापूर पोलिसांनी दोन संशयित तरुणांना नुकतेच ताब्यात घेतले. येथील शिक्रापूर- चाकण रस्त्यावरील जुना टोलनाका परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरत असताना पोलिसांनी पाठलाग करून या दोघांना पकडले.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी सांगितले की, शिक्रापूर- चाकण रस्त्यावरील जुना टोलनाका परिसरात पोलिस हवालदार अमोल दांडगे, नारायण वाळके आणि योगेश आव्हाड हे बुधवारी (ता. ११) सायंकाळच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी दोन तरुण संशयास्पदरीत्या परिसरात रेंगाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिस त्यांच्या दिशेने जात असल्याचे पाहताच या दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सतर्कता दाखवत त्यांना तातडीने ताब्यात घेतले. राहुल राम राठोड (वय २२, मूळ रा. बसवनगर, जि. बिदर, कर्नाटक, सध्या रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) आणि योगेश शंकर सारगे (वय १९, मूळ रा. कासार बालकुंदा, जि. लातूर, सध्या रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर), अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावरून ते चोरीच्या उद्देशानेच फिरत असल्याची खात्री पोलिसांना झाली. याप्रकरणी पोलीस शिपाई नारायण चंद्रकांत वाळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे करत आहेत. परिसरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली असून संशयित हालचाली आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com