शिवतक्रार म्हाळुंगी येथे महिलेला पतीची मारहाण
शिक्रापूर, ता. १४ : शिवतक्रार म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे घरगुती वादातून एका विवाहितेस पतीकडून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात पती बबन साहेबराव जगदाळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, फिर्यादी रेणुका बबन जगदाळे (वय ३३, रा. शिवतक्रार म्हाळुंगी) या शुक्रवारी (ता. १३) घरात असताना त्यांचा पती बबन साहेबराव जगदाळे हा दारूच्या नशेत घरी आला. त्यावेळी, ‘तुम्ही घरखर्चासाठी पैसे देत नाही, कर्ज फेडत नाही, घरात का लक्ष देत नाही,’ असे रेणुका यांनी पतीला विचारले. याचा राग मनात धरून बबन याने पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये चाललेला वाद विकोपाला गेल्याने बबन याने रेणुका याने पत्नी रेणुका यांना लाथाबुक्क्यांनी तसेच फायबरचा पाईप आणि बुटाने बेदम मारहाण केली. या घटनेत रेणुका या गंभीर जखमी झाल्या. त्यांनी या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी बबन जगदाळे याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस हवालदार किशोर तेलंग हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

