

शिक्रापूर, ता. २४ : पुणे- नगर महामार्गावर बेकायदेशीर व धोकादायक पद्धतीने गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या दोघांना शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिसांनी अटक केली. या कारवाईत दहा गॅस सिलिंडर आणि एक मोटार जप्त केली आहे. अशोक दिलीप पवार (वय ३४, रा. परडी माटेगाव, ता. वडवणी, जि. बीड) आणि अनिल तुकाराम चव्हाण (वय २१, रा. जोगवाडा, ता. जिंतूर, जि. परभणी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी माहिती दिली की, शिक्रापूर येथील चाकण चौक परिसरात पोलिस वाहतूक नियंत्रण करत असताना सोमवारी (ता. २३) रात्री अहिल्यानगरकडून येणाऱ्या एका मोटारीमधून बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडरची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लहानू बांगर, पोलिस हवालदार मिलिंद देवरे, ट्रॅफिक वॉर्डन अमोल राऊत, जिंदावली जमादार, किरण थोरात, अनिल वाडेकर, सुरेंद्र वाटोरे आदी पथकाने सापळा रचला. त्यांनी संशयित मोटार (क्र. एम.एच. २४ ए.यू. ९०९७) अडवून तपासणी केली. त्यात एचपी गॅस कंपनीचे घरगुती वापराचे सात आणि व्यावसायिक वापराचे तीन, असे एकूण दहा सिलिंडर आढळले. चालकाकडे आवश्यक कागदपत्रे, बिले किंवा परवाने नसल्याचे उघड झाले. चौकशीत आरोपींकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिस हवालदार मिलिंद देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे आणि प्रतीक जगताप करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.