गायरान जमिनीवर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी

गायरान जमिनीवर कचरा 
टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी
Published on

शिक्रापूर, ता. २५ ः सणसवाडी (ता. शिरूर)सह दरेकरवाडी, डिंग्रजवाडी येथील सरकारी गायरान जमिनीमध्ये टाकण्यात येणाऱ्या घातक कचऱ्यामुळे परिसरात प्रदूषण होऊन भिल्ल समाजातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मल्हार बहुजन सेनेने शिक्रापूर पोलिसांकडे निवेदन देवून केली आहे.
सणसवाडी, दरेकरवाडी व डिंग्रजवाडी येथे सरकारी राखीव गायरान जमिनी असून सदर ठिकाणी भिल्ल समाजाच्या नागरिकांच्या वस्त्या आहेत. सध्या या ठिकाणी काही संस्थांच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे औद्योगिक व घरगुती कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मल्हार बहुजन सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक शिक्रापूर यांना निवेदन देत कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी मल्हार बहुजन सेनेचे जिल्हाध्यक्ष विशाल घोंगडे, शिरूर महिलाध्यक्ष विमल मोरे आदी उपस्थित होते. याबाबत बोलताना निवेदन प्रदूषण नियंत्रण महामंडळ व तहसीलदार यांना देखील देत असून पुढील आठ दिवसात काही कारवाई न झाल्यास आंदोलन करणार असल्याचे दगडे पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com