प्रमोद क्षीरसागर पोलिस निरीक्षकपदी

प्रमोद क्षीरसागर
पोलिस निरीक्षकपदी
Published on

शिक्रापूर, ता. २५ : पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिस निरीक्षकपदी प्रमोद क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून, त्यांच्यावर आता संपूर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणाची महत्त्वाची जबाबदारी असेल. क्षीरसागर यांनी यापूर्वी जिल्ह्यातील आळेफाटा (ता. जुन्नर) आणि शिक्रापूर (ता. शिरूर) या दोन मोठ्या पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल झाली असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या प्रदीर्घ अनुभवामुळेच त्यांची एलसीबीच्या प्रमुखपदी निवड केली आहे.

05345

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com