डिंग्रजवाडीतून सर्व्हे मशिनची चोरी

डिंग्रजवाडीतून सर्व्हे मशिनची चोरी
Published on

शिक्रापूर, ता. २७ : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील एका कंपनीच्या साइट कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी पाच लाख रुपये किमतीच्या दोन सर्व्हे (पाहणी) मशीनसह साहित्य चोरून नेले. ही घटना बुधवारी (ता. २५) रात्री घडली असून, याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत संग्राम शामराव मोरे (वय ४३, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिंग्रजवाडी येथील इगवूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेअर संग्राम मोरे यांनी बुधवारी काम संपल्यानंतर दोन सर्व्हे मशीन, बॅटऱ्या आणि चार्जर असा पाच लाखांचा ऐवज साइट कार्यालयात ठेवला होता.
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथून एका सर्वेक्षण अभियंत्याची सर्व्हे मशीन चोरीला गेल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संग्राम शामराव मोरे (वय ४३, रा. चिखली प्राधिकरण, चिंचवड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी सकाळी सुरक्षारक्षक आले असता, त्यांना ऑफिसच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तपासणी केली असता आतील मशीन चोरीला गेल्याचे उघड झाले. पुढील तपास पोलिस हवालदार अजित इंगवले करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com