खालुंब्रे येथे टँकरमधून पामतेलाची चोरी

खालुंब्रे येथे टँकरमधून पामतेलाची चोरी

Published on

कुरुळी, ता.१० : खालुंब्रे (ता. खेड) येथे पामतेलाच्या टँकरमधून चालकानेच तेलाची परस्पर विक्री केली. ही घटना शनिवारी (ता. ८) पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी टँकर चालकासह तिघांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. राम उजागीर यादव (वय ४०, रा. उत्तर प्रदेश), दुर्गाराम रूपाराम परमार (वय ६३, रा. निगडी), राजुराम बचनराम चौधरी (वय ४२, रा. निघोजे ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चालकाने खोपोली येथे टँकरमध्ये पामतेल भरले. तो टँकर घेऊन जात असताना खालुंब्रे गावात अन्य दोन आरोपींच्या मदतीने २१० लिटर पामतेल चोरून काढले. याप्रकरणी अधिक तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.