भांबोलीत कोयत्याने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

भांबोलीत कोयत्याने मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल
Published on

कुरुळी, ता. ८ : सोमवारी (ता. ६) चाकण एमआयडीसीमध्ये भांबोली गावच्या हद्दीत ओमकार परमेश्‍वर शिवले (वय १९, रा. चांदुस ता. खेड) आणि त्यांचा भाऊ साईराज याच्याबरोबर पंधरा दिवसांपूर्वी धक्का लागून काही जणांचा किरकोळ वाद झाला होता. राजगुरुनगर बस स्थानकावर झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी मोटरसायकल वरून येऊन फिर्यादीला डोक्यात कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले.
महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाणे येथे या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील आरोपी भागवत लक्ष्मण ठोंबरे (वय १८, रा. कडूस ता. खेड) आणि कुणाल सतीश तूळवे (वय १९, रा. करंजविरे ता. खेड) यांना अटक करण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या एका १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन युवकास देखील ताब्यात घेण्यात आले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com