निघोजेतील ३४ लाभार्थ्यांना ३६ हजारांचा धनादेश वितरित

निघोजेतील ३४ लाभार्थ्यांना ३६ हजारांचा धनादेश वितरित

Published on

कुरुळी, ता. २८ : निघोजे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या वार्षिक पाच टक्के निधीतून अपंग कल्याण योजनेअंतर्गत ३४ लाभार्थ्यांना प्रत्येकी ३५ हजार ९१९ रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले.
चाकण औद्योगिक नगरी असणाऱ्या निघोजे येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दिव्यांग व्यक्तींना वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून पाच टक्के निधी हा लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत असल्याची माहिती ग्रामअधिकारी नितीन नाईकडे यांनी दिली. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लोकनियुक्त सरपंच सुनीता येळवंडे, उपसरपंच दीपक कांबळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थी मयूर शिंदे, प्रमोद शिंदे, विनायक येळवंडे, योगीनाथ शिंदे, उषा पाडेकर, प्रसाद सालवे, जालिंदर बेंडाले, सुरेश कांबळे, शोभा कांबळे, विमल तांबे, लक्ष्मीकांत कदम, सागर कोहिनकर, ईश्‍वर शिंदे, निर्मला आल्हाट, दादाभाऊ काले, ताईबाई काले उपस्थित होते.


2300

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com