राजेंद्र कोणकेरी यांना महासंचालक पदक

राजेंद्र कोणकेरी यांना 
महासंचालक पदक
Published on

कुरुळी, ता. ४ : उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कोणकेरी यांना पोलिस सेवेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘पोलिस महासंचालक पदक’ देऊन गौरवण्यात आले. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. कोणकेरी यांनी आपल्या कारकिर्दीत ६९ आरोपींवर मकोका, २७ आरोपींना तडीपार आणि ५ आरोपींवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच, खुनाच्या १२ आरोपींना जन्मठेप, बलात्काराच्या दोन आरोपींना १० वर्षे शिक्षा मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दोन खून आणि पाच घरफोडीचे गुन्हे उघड करून आरोपींना जेरबंद केल्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, विजय ढमाळ आणि सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

02428

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com