खतांच्या किमतीत दरवाढ झाल्याची अफवा

खतांच्या किमतीत दरवाढ झाल्याची अफवा
Published on

काटेवाडी, ता. २१ : रासायनिक खतांच्या किमती मागील वर्षीच्या तुलनेत पुन्हा एकदा वाढल्या अशा प्रकारच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जात आहेत. वृत्तवाहिन्यांचे लोगो वापरून या पद्धतीच्या इमेजेस सोशल मीडियात व्हायरल झाल्या आहेत. यामुळे सहाजिकच ग्रामीण भागामध्ये या अफवांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी कोणत्याही खतांच्या किमतीमध्ये दरवाढ झाली नसल्याचा निर्वाळा यापूर्वीच दिला आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या वतीने १२ मे रोजी आगामी खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये शेतकऱ्यांना गुणवत्ता पूर्ण व वाजवी दरात निविष्ठांचा पुरवठा करण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथकाची स्थापना केली आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत संयुक्त/मिश्र खतांच्या किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे.


सोशल मीडियाच्या माध्यमातून खताच्या दरामध्ये वाढ झाल्याच्या इमेजेस फिरू लागल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये सातत्याने रासायनिक खतांच्या किमती खरीप हंगामाच्या पूर्वी वाढवल्या जातात. केंद्र शासनाने २०२२ मध्ये थेट खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना दिलेले अनुदान तसेच पोटॅशवरील अनुदानामध्ये प्रतिटन ६ हजार रुपयांनी कपात केली होती. यामुळे रासायनिक खताच्या किमती आता शेतकऱ्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या. त्यामुळे २०२३ च्या हंगामापर्यंत रासायनिक खताच्या किमतीमध्ये सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यात यंदाच्या हंगामापूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून खत दरवाढीच्या अफवा पसरू लागल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत.


निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत करा तक्रार
सन २०२४-२५ नुसार खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावर कृषी अधिकारी, पंचायत समिती यांनी निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष उघडण्यात आले आहेत. निविष्ठांच्या गुणवत्ता तसेच दराबाबत या तक्रार निवारण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांकावर देखील शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतात.
-----------------------------------------
मागील वर्षीच्या तुलनेत सध्याचे खताचे दर....
खत............२०२३ चे दर............ २०२४ चे दर
युरिया...........२६६......................२६६
१०:१६:१६.........१,४७०.................१,४७०
१२:३२:१६.........१,४७०.................१,४७०
१८:४६:००..........१,३५०................१,३५०
२४:२४:००...........१,५५०...............१,७००
१९:१९:१९............१,६५०..............१,६५०
१४:३५:१४.............१,५००.............१,७००
९:२४:२४.............१,७९०............ १,९००
८:२१:२१.....…...... १,७५०.............१,८००
१४:२८:००.......... १,६५०..............१,६५०
१६:१६:१६......... १,२५०..............१,२५०
११:५२:००.......... १,३५०.............१,३५०
S-१५:१५:१५.......... १,४००............१,४७०
MOP............... १,७००............१,६५५
सुपर फॉस्फेट...............५७५............. ५६५
अमोनियम सल्फेट..........१,०००............१,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com