वीस ठिकाणी अत्यावश्यक सेवा

वीस ठिकाणी अत्यावश्यक सेवा
Published on

काटेवाडी, ता. २५ : आषाढी वारी सोहळ्यादरम्यान पालखी मुक्काम तळ असलेल्या ठिकाणी आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व काही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावर जिल्ह्यात एकूण २० ठिकाणी अत्यावश्यक सेवा वारकऱ्यांना मिळणार आहे.
पालखी मार्गावर ११२ वैद्यकीय अधिकारी आणि ३३६ कर्मचाऱ्यांची आरोग्यसेवेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ११५ आरोग्य पथके, ५७ फिरते वैद्यकीय पथक आणि १७९ रुग्णवाहिकेद्वारे आरोग्य सुविधा करण्यात येणार आहे तर १२ ठिकाणी हिरकणी कक्ष उभारण्यात येईल. सोहळ्या दरम्यान ४१ विशेषज्ज्ञ व ४८ अधिपरिचारिका कार्यरत असणार आहेत.
पालखी मार्गावर असलेल्या शासकीय आणि खासगी रुग्णालयातील १० टक्के खाटा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
आरोग्य विभागाच्या वतीने पाणी स्त्रोतांचे सर्वेक्षण व निर्जंतुकीकरण, कीटकजन्य आजारांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना, सर्व हॉटेल्स व ढाबा, उपहारगृहे येथील कामगारांची आरोग्य तपासणी व उपचार आधी गोष्टींवर भर देण्यात आला आहे. या सोहळ्या दरम्यान २० ठिकाणी अतिदक्षता विभाग सुरू करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या डॉ. वंदना जोशी यांनी दिली.
दरम्यान, आषाढी वारीसाठी २०० पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली असून ४५ ठिकाणी पाणी भरण्याची सुविधा असणार आहे.

अशी असेल शौचालयांची सुविधा
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा..... १ हजार ८००
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा.... १ हजार २००
संत सोपान महाराज पालखी सोहळा ....२५०

या ठिकाणी असणार अतिदक्षता विभाग....
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
१) ग्रामीण रुग्णालय आळंदी
२) जिल्हा रुग्णालय पुणे
३) प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा
४) झेंडेवाडी ग्रामीण रुग्णालय सासवड
५) ग्रामीण रुग्णालय सासवड
६) ग्रामीण रुग्णालय जेजुरी
७) प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हा, जेजुरी
------------------------------------
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
१) प्राथमिक आरोग्य केंद्र देहू
२) जिल्हा रुग्णालय पुणे
३) प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा
४) प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर
५) ग्रामीण रुग्णालय यवत
६) प्राथमिक आरोग्य केंद्र वरवंड (उपजिल्हा रुग्णालय दौंड )
७) उपकेंद्र उंडवडी सुपे ( बारामती)
८) उपजिल्हा रुग्णालय बारामती
९) प्राथमिक आरोग्य केंद्र सणसर
१०) उपकेंद्र अंथुर्णे, प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे
११) ग्रामीण रुग्णालय निमगाव केतकी
१२) उपजिल्हा रुग्णालय इंदापूर
१३) उपकेंद्र सराटी इंदापूर

बारामती तालुक्यातील संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मुक्काम ठिकाणी अतिदक्षता विभागासह इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याबाबत पूर्वतयारी झाली असून औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
- डॉ. मनोज खोमणे, तालुका आरोग्य अधिकारी बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com