उपमुख्यमंत्री पवार यांनी केले पालखी रथाचे सारथ्य

उपमुख्यमंत्री पवार यांनी केले पालखी रथाचे सारथ्य

Published on

काटेवाडी, ता. ७ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (ता.७) काटेवाडी येथे दुपारच्या विश्रांतीसाठी विसावला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालखी रथाचे सारथ्य केले.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज हा पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यापासून वारकरी व सर्वसामान्य जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काटेवाडीकरांना देखील सोहळ्यामध्ये मेंढ्यांच्या रिंगणाचा एक वेगळा मान आहे. दरवर्षी माझ्या घरी वारी सोहळ्यामधील दिंडी प्रमुखांना जेवण असते. दरम्यान, अर्थसंकल्पाबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, अतिशय विचारपूर्वक अर्थसंकल्प आम्ही मांडलेला आहे. ७.५ हॉर्सपॉवरच्या विद्युत पंपात शेतकऱ्यांसाठी वीजबिलात माफी, दीड हजार रुपये प्रतिमहिना महिलांसाठी आणलेली योजना, उच्च शिक्षणाबाबत मुलींसाठी केलेली फी माफी हे करत असताना आम्ही कुणाच्याही हातात पैसे दिले नाहीत. थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कसे पैसे जमा होतील याकडे लक्ष दिलेले आहे.

वारीमध्ये सहभागी होण्याचा त्यांचा अधिकार
पालखी सोहळ्यामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार देखील सहभागी झाले होते. मात्र, या दोघांनीही समोरासमोर येणे टाळले. पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याचा प्रत्येकाला अधिकार अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली. वारीमध्ये एक वेगळा आनंद मिळतो. उत्साह असतो. तो अनुभवण्यासाठी मी वारीमध्ये सहभागी झालो. इतर कोणी त्यामध्ये सहभागी होत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, असे केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वारी सोहळ्यामध्ये सहभागी होण्याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.


महिलांसाठी राबवलेल्या योजना यामुळे मला वारी सोहळ्यामध्ये अनेक महिला वारकरी भेटल्या. या योजना चांगल्या आहेत असे म्हणून त्यांनी स्वागत देखील केले. पारदर्शकपणे या योजना कशा राबवत या येतील याकडे देखील आम्ही लक्ष देणार आहे. वारकरी महामंडळामध्ये कोणतेही राजकीय व्यक्ती सहभागी होणार नाही. या महामंडळाला दिलेल्या निधीबाबत त्यांनीच निर्णय घ्यायचा आहे. त्यामध्ये राजकारण येणार नाही.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

00578

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.