बारामतीत खरबूज, कलिंगडांनी खाल्ला ‘भाव’

बारामतीत खरबूज, कलिंगडांनी खाल्ला ‘भाव’
Published on

काटेवाडी, ता. १८ : बारामती बाजार समितीमधील भाजीपाला लिलाव बाजारामध्ये गावरान गवार, खरबूज, कलिंगड आदींनी चांगलाच ‘भाव’ खाल्ला आहे. सध्या बाजारात दोडका, पावटा, लसूण, हिरवी मिरची आदीचे बाजारभाव तेजीत आहेत.
उन्हाचा चटका वाढू लागल्याने पुढील काळात दरामध्ये वाढ होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर मागील काही दिवसांपासून जळोची उपबाजारात खरबुजाची विक्रमी आवक होत आहे. आवक वाढली असली तरी खरबुजाचे दर टिकून आहेत. तसेच हिरव्या मिरचीच्या दरात वाढ झाली आहे.

उन्हामुळे कलिंगड, खरबूज, काकडी आदींची किरकोळ बाजारामध्ये मागणी वाढू लागली आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमवारी (ता. १७) लिलाव बाजारामध्ये खरबुजाची विक्रमी ३५० क्विंटल एवढी आवक झाली होती.

गावरान गवार प्रतिक्विंटल १० हजार रुपये
मागील काही काळापासून गावरान गवारीचे दर देखील तेजीत आहेत. गावरान गवारीला उच्चांकी १३ हजार रुपये प्रती क्विंटल तर सरासरी १० हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभावव मिळाला आहे.

दुधी भोपळा, गाजराचे भाव घसरले
एक महिन्यापासून गवार व हिरवी मिरची चांगली तेजीत आहे. त्यासोबतच शेवगा, दोडका आदींचे दर देखील एका क्विंटल ला २ हजार ५०० ते ३ हजारांपर्यंत गेले आहेत. वांगे, कारले व दुधी भोपळा, गाजर आदींचे दर घसरले आहेत.

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोमवारचे (ता.१७) सरासरी लिलाव बाजारभाव (किमान व कमला) व आवक-क्विंटलमध्ये : आले : (२५ ) १४००-३०००, कलिंगड : (५० क्विंटल) ८००-१५००, काकडी/लोकल : (१४ ) १५००-२०००, कारले : (१५ क्विंटल) ३०००-३५००, कोथिंबीर : (७५) प्रति शेकडा ७००-८००, गवार : (१२) १०,०००-१३,०००, गाजर : (१२) २०००-३०००, टोमॅटो : (१६) ८००-१०००, दुधी भोपळा : (१२) ७००-१०००, पपई : (१२) १३००-१५००. पालक : (३७) दर प्रति शेकडा ४००-५००, पेरु : (१२) २५००-३०००, फ्लॉवर : (१८) ८००-१०००, बटाटे : (३५०) किमान: १५०० कमाल : २०००-१०००, भेंडी : (१२) ४०००-४५००. मुळा : (१२) ७००-८००, मेथी : (५० क्विंटल), दर प्रतिशेकडा ७००-८००, राजमा : (१३) ३५००-४०००, लसूण : (१००) १०,०००-१२,०००, वटाना गोल्ड्न : (३०) २५०० -१८००, वांगे : (१६) २५००-१०००, शिमला मिरची : (१५) १५००-२०००. शेपू : (३५) दर प्रतिशेकडा ७००-८००, शेवगा : (२०) २५००-३०००.
हिरवी मिरची : (१५) ३५००- ४०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com