

काटेवाडी, ता. ४ : धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर व्हॉट्सॲप स्टेट्सवर ठेवल्याप्रकरणी बारामतीतील एका माथेफिरूवर रविवारी (ता. २) पोलिस प्रशासनाने कारवाई केली, अशी माहिती बारामती शहर पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली.
एका व्यक्तीने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर फोटो ठेवून त्यावर धार्मिक तेढ निर्माण होईल, असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला असल्याची माहिती बारामती पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावर आक्षेपार्ह मजकूर मिळून आला. या व्यक्तीच्या कृत्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन बारामती शहर हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये या व्यक्तीविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १२७ प्रमाणे प्रस्ताव तयार केला. तो अतिरिक्त पोलिस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी गणेश बिरादार यांना सादर केला. यावर सुनावणी घेऊन या व्यक्ती कृती ही धार्मिक तेढ निर्माण करणारी असल्याची खात्री झाली. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून त्याने योग्य व लायक जामीनदार न दिल्याचे त्याची १४ दिवसांकरिता रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.