सुरक्षा साधनांचा सातत्याने वापर करा

सुरक्षा साधनांचा सातत्याने वापर करा
Published on

काटेवाडी, ता. ४ : ग्राहकांना अखंडित वीज सेवा देताना कर्मचाऱ्यांना दररोज जिवाची जोखीम पत्करून वीज दुरुस्तीची कामे करावी लागतात. ही विजेची कामे करताना लाइनमन व लाइनवुमन्सनी सुरक्षा साधनांचा सातत्याने वापर करावा असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.

ऊर्जा भवन येथील सभागृहात आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय लाइनमन दिवस’ कार्यक्रमात वीज कर्मचाऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी बारामती ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) धैर्यशील गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, म्हसू मिसाळ व संजय सोनवलकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पेठकर म्हणाले की, महावितरणची आर्थिक परिस्थिती दोलायमान आहे. त्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी महसूल वाढवून वीजचोरीला आळा घातला पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रातील थकबाकीवर लक्ष केंद्रित करून ती वसूल करण्यासाठी टीम वर्कने काम करावे व दिलेल्या मुदतीत लक्ष गाठावे.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता दीपक लहामगे यांनीही वीज कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन कोरडे यांनी वीज सुरक्षेबाबत सादरीकरण दिले. तर उपस्थित लाइनमन मधून हर्षद गावडे, राजेंद्र झिंझाडे व दामोदर कोकरे यांनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला बारामती शहराचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता गणेश जमाले, ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ यांचेसह विभागातील शाखा अभियंते व वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00852

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com