

काटेवाडी, ता. २७ ः शिर्सुफळ (ता. बारामती) येथील ग्रामस्थांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शिर्सुफळ येथे नव्याने शेळी- मेंढी बाजार सुरू करण्यात येणार आहे. या बाजाराचा प्रांरभ बारामती बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांचे हस्ते शुक्रवारी (ता. २८) होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जुई हिवरकर, तर प्रमुख उपस्थितांमध्ये अप्पासाहेब आटोळे, हिराबाई झगडे, शिवाजी झगडे, अनिल हिवरकर आदी उपस्थित असणार आहेत. बारामती तालुक्यातील व इतर परिसरातील शेळीपालन व मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ मिळावी म्हणून हा बाजार सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मध्यस्थी कमी होऊन विक्रेत्यांना थेट खरेदीदारांशी संपर्क साधता येणार आहे. परिणामी चांगला दर मिळण्याची संधी निर्माण होणार असल्याची माहिती सचिव अरविंद जगताप यांनी दिली. पशुपालक, व्यापारी, ग्रामस्थ यांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.