पिके बहरण्यासाठी दोन लाख टन खतसाठा मंजूर

पिके बहरण्यासाठी दोन लाख टन खतसाठा मंजूर

Published on

काटेवाडी, ता. २० : जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सुमारे दोन लाख हेक्टर आहे. यावर्षी ४८ हजार क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. एक लाख ९६ हजार टन रासायनिक खतसाठा मंजूर आहे. त्यानुसार पुरवठ्याबाबत अडचण येणार नाही. युरियाचा ७ हजार ५०० टन आणि डीएपीचा एक हजार टनांचा संरक्षित (बफर) साठा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी दिली.

काचोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी ॲग्री हॅकॅथॉन हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून यात कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कंपन्या, स्टार्टअप्स तसेच उद्योग संघटना आदींनी स्पर्धक म्हणून नोंदणी केली आहे. यात कृषी क्षेत्रातील विविध समस्यांचे आठ प्रकारात वर्गीकरण करण्यात आले असून त्यावर स्पर्धकांनी सादर केलेल्या उपाययोजनांची छाननी करून एक ते ३ जूनदरम्यान हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येणार आहे.


एआय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, जीआयएस, आयओटी, ड्रोन तंत्रज्ञान, शेतीमध्ये मशिन लर्निंग आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यातून प्रत्येक वर्गीकरणातील प्रथम विजेत्यास २५ लाख रुपये व द्वितीय विजेत्यास १५ लाख रुपये पारितोषिक म्हणून दिले जाईल.
- संजय काचोळे, जिल्हा कृषी अधीक्षक


उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांची खरिबाबत बौठक
पुढील पाच वर्षात निर्यातक्षम पिकांच्या लागवड तसेच उत्पादन वाढीसाठी समूह अर्थात क्लस्टर पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. यात केळी, अंजीर, स्ट्रॉबेरी, आंबा, करडई व सूर्यफूल, ज्वारी, भात, भाजीपाला, सोयाबीन यासह ऊस उत्पादकतेत वाढ करणे यावर भर दिला जाणार आहे, आदी विषयांवर उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासोबत झालेल्या खरीप आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली आहे.


बियाणे मागणी, पुरवठा नियोजन (क्विंटलमध्ये)
बाजरी : १८८०
भात : १९,९५०
मका : ५७५०
भुईमूग : ९५०
सूर्यफूल : ७५
तीळ : २
सोयाबीन : १५,०००
तूर : १८५
मूग : ५१०
उडीद : ४४०
वाटणा : ९१०
इतर पिके : २६५०


खरीप २०२५-२६ साठी मंजूर खतसाठा (टनामध्ये)
युरिया : ९१,७६१
डीएपी : १४,८८८
एम ओ पी : ३६००
एस एस पी : १८,२००
एनपीके : ६८,२००
--------------------------------------------
खरीप २०२५ साठी प्रमुख पिकांचे
नियोजित क्षेत्र (हेक्टर मध्ये )
भात : ६१,२२०
बाजरी : ४७,०००
मका : ३८,०००

नाचणी : २१००
सोयाबीन : ५१,०००
भुईमूग : ८०८०
मूग : १३,०००
तूर : १५९०
उडीद : २४००
16033, 16034

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com