प्रकाश सापळे लावून ठेवा हुमणीवर नियंत्रण

प्रकाश सापळे लावून ठेवा हुमणीवर नियंत्रण

Published on

काटेवाडी, ता. २१ : जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे जमिनीतून बाहेर पडतात. मात्र, मे महिन्यामध्येच वळवाचा पाऊस जोरदार पडत असल्याने अनेक ठिकाणी हुमणीचे भुंगेरे दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना लवकरच कडुनिंब, बोर, बाभळी यासारख्या झाडाशेजारी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट करा. किडींचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवा, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

खरीप हंगामात हुमणी अळीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होते. शाश्वत पाणीपुरवठ्याच्या जमिनीत घेतल्या जाणऱ्याया पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. भुंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हाणीकारक आहे. त्यामुळे पीक वाळून जाते. जास्त प्रदुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीक नाश पावते. वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, कडुनिंब, बोर या झाडांवर गोळा होतात. अगोदर मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. त्यापाठोपाठ नर भुंगेरे बाहेर पडतात. झाडांवर पाने खाण्यासाठी भुंगे गोळा होतात. अशा झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत व रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेरे नष्ट होतात.


हुमणीसाठी अत्यंत प्रभावी नियंत्रण पध्दत..
१. वाळवाचा पाऊस ४० मिलीपेक्षा जास्त झाला की एरंड आंबवण सापळा लावावा.
२. एरंडीच्या बिया दोन किलो चेचून घ्याव्यात. त्यामध्ये बेकरीतील २५ ग्रॅम इस्ट पावडर मिसळून घ्यावी.
३. ५० ग्रॅम बेसन पीठ व १ते १.५० लिटर पाणी ओतून ढवळून घ्यावे.
४. हे आमिष एका पसरट अंडाकृती मातीचे मडक्यामध्ये द्रावण आंबवून घ्यावे.
५.मडके तोंड उघडे ठेवून जमिनीत गतवर्षी हुमणीग्रस्त झालेल्या क्षेत्रातील निंब किंवा बाभळीच्या झाडानजीक किंवा क्षेत्राच्या लगत पुरावे.
६. अंतर ठेवून बल्ब लावावा. असंख्य प्रमाणात हुमणीचे प्रौढ भुंगेरे सापळ्यात अडकून मरतात.


परिसरामध्ये ‘क्लोरोट्राचिया सिराटा’
अंडी, अळी, कोष व भुंगेरे अशा चार अवस्थांमधून या किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो. जून महिन्याच्या सुरुवातीला हुमणीचे भुंगे जमिनीतून बाहेर पडतात. हे किडे कडूनिंब, बाभळ बोर झाडावर जमा होतात. नर आणि मादीचे तिथेच मिलन होते. मिलनानंतर नर लगेच मरतो आणि मादी जमिनीत साधारण १३ सेमीवर ६० ते ७० अंडी घालते.
अंडी साधारणतः: १५ ते १८ दिवसांनी उबतात. अळीच्या तीन अवस्था आहेत. पहिली अवस्था २५ ते ३० दिवस दुसरी अवस्था ४५ दिवस तिसरी अवस्था १४० ते
१४५ दिवसांची असते. दुसऱ्या अवस्थेतील अवस्थेतील आळ्या जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये आढळतात. तर तिसऱ्या अवस्थेतील अळी अतिशय खादाड असते. पुढील
तीन-चार महिने पूर्णवस्थेतील अळी पिकाचे नुकसान करते. त्यामुळे हुमणीचा सर्वाधीक प्रादुर्भाव ऑक्टोबर ते ऑगस्ट महिन्यामध्ये अढळून येतो. पूर्ण वाढ झालेली हुमणी अळी जमिनीत ७० सेम पर्यंत खोल, कोषावस्थेमध्ये जाते. १८० दिवस ही कोषावस्था असते. पाऊस पडल्यानंतर हे भुंगे पुन्हा बाहेर पडतात व शेतातील कडुनिंब, बाभूळ व बोर या झाडांवर जमा होतात. येथेच नर मादीचे मिलन होते.

एका प्रकाश सापळ्यात किमान १०० भुंगेरे अडकून पडून मरून जातात. एक मादी भुंगेरा ५० ते ६० अंडी घालून त्यातून किमान ५०
हुमनीच्या आळी तयार होतात. असे १०० मादी भुंगेरे जर प्रकाश सापळ्यात मरून गेले तर एका सापळ्यामुळे जवळपास ५ हजार हुमनीची आळी कमी खर्चात नष्ट होते. एका गावात किमान १० शेतकऱ्यांनी जरी सापळे लावले तरी ५० हजार हुमनी आळी आपण नष्ट करू शकतो.
- गणेश जाधव

00910

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com