उत्पादनक्षम फळझाडांच्या रोपांची लागवड

उत्पादनक्षम फळझाडांच्या रोपांची लागवड

Published on

काटेवाडी, ता. २३: कन्हेरी फळरोप वाटिकामध्ये शेतकऱ्यांना अधिकाधिक कलमे उपलब्ध होईल, यादृष्टीने उत्पादनक्षम रोपे आणि फळझाडांच्या रोपांची लागवड करा. गेल्या वर्षीच्या तुलनेत रोपे, कलमांच्या विक्रीमध्ये वाढ करण्याकरीता प्रयत्न करावे, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन उद्यान, कन्हेरी शिवसृष्टी, महाराष्ट्र परिवहन महामंडळ कार्यशाळा येथील विकास कामांची पाहणी करून संबंधित अधिकांऱ्याकडून माहिती घेतली. तालुका फळरोप वाटिका कार्यालयाच्या छतावरील सोलर पॅनलचे परिसरातील नवीन होणाऱ्या वाहनतळाच्या छतावर स्थलांतर करावे. प्रक्षेत्रावर शिल्लक राहिलेल्या मोकळ्या जागेत नारळाच्या कलमांची लागवड करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
शिवसृष्टी प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार असून सद्यःस्थितीत पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास जगासमोर भव्यतेने प्रदर्शित होईल यादृष्टीने प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधून बारामतीच्या वैभवात भर घालणारी भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात यावी. कन्हेरी वनउद्यान परिसरामध्ये वड, उंबर, पिंपळ, पिंपरण, करंज, कडूनिंब आदी स्थानिक प्रजातीच्या रोपांची लागवड करावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या.
यावेळी उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सहायक वनसंरक्षक अतुल जैनक, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे बारामती आगार प्रमुख रविराज घोगरे आदी उपस्थित होते.

परिवहन महामंडळ कार्यशाळेची कामे करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजे. तसेच कामकाजाच्या अनुषंगाने त्यांच्या सूचनाही विचारात घ्याव्यात. परिसरातील जागेचे नीटपणे सपाटीकरण करून घ्यावे, संरक्षण भिंतींचे आरेखन बस आकाराप्रमाणे करावे. तालुक्यातील विकासकामे गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

00915

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com