शाश्वत उत्पन्नासह प्रगतीची सुवर्णसंधी
काटेवाडी, ता. १७ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) शेतकऱ्यांसाठी फळबाग लागवडीची संधी उपलब्ध झाली आहे. १०० टक्के अनुदानासह सलग शेत, शेताच्या बांधावर किंवा पढिक जमिनीवर फळझाडे, फुलपिके, मसाला पिके आणि औषधी वनस्पती लावून शेतकरी शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करू शकतात. ही योजना राज्यातील सर्व ३४ जिल्ह्यांमध्ये राबवली जात असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सुवर्णसंधी ठरत आहे.
मनरेगा योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागात शाश्वत रोजगार निर्मिती करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. फळबाग लागवड कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर फळपिके, औषधी वनस्पती, फुलपिके आणि मसाला पिकांची लागवड करून आर्थिक स्थैर्य मिळवण्याची संधी आहे. १०० टक्के अनुदानामुळे आर्थिक भार न पडता शेतीत नवीन संधी निर्माण होतात. राज्य आणि केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा वापर करून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यासाठी अधिक माहितीसाठी जवळच्या ग्रामपंचायत किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधा.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
* लागवडीचे क्षेत्र : सलग शेत, शेताच्या बांधावर किंवा पडीक जमिनीवर ०.०५ हेक्टर ते २.०० हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते.
* लागवड कालावधी: जून ते मार्च या कालावधीत लागवड शक्य.
या पिकांचा समावेश
* फळपिके:
- आंबा
- काजू
- चिकू
- पेरू,
- डाळिंब
- संत्रा
- मोसंबी
- कागदी लिंबू
- नारळ
- बोर
- सीताफळ
- आवळा
- चिंच
- जांभूळ
- कोकम
- फणस,
- अंजीर
- द्राक्ष
- ड्रॅगन फ्रूट
- अव्हॅकेडो, केळी (३ वर्ष).
* औषधी वनस्पती/वृक्ष:
- साग
- कडुनिंब
- शेवगा
- बांबू,
- कढीपत्ता
- करंज
- जट्रोफा.
फुलपिके:
- गुलाब
- मोगरा
- निशिगंध, सोनचाफा.
* मसाला पिके:
लवंग,
दालचिनी,
जायफळ
मिरी.
अशी आहे अनुदानाची तरतूद
- पहिल्या वर्षी १०० टक्के अनुदान.
- दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी बागायती पिकांसाठी ९० टक्के
- कोरडवाहू पिकांसाठी ७५ टक्के झाडे जिवंत असणे आवश्यक.
---------------------
लाभार्थी पात्रता....
* लाभार्थ्याकडे स्वतःच्या नावे जमीन आणि जॉबकार्ड असणे आवश्यक.
* कूळ कायद्याखालील जमिनीवर कूळाच्या संमतीने लागवड शक्य.
* लागवड केलेली झाडे दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी जिवंत ठेवण्याची जबाबदारी लाभार्थ्याची.
अर्ज प्रक्रिया.....
इच्छुक शेतकऱ्यांनी गावातील ग्रामपंचायत किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा. जॉबकार्ड, ७/१२ उतारा आणि आवश्यक कागदपत्रे सादर करून योजनेचा लाभ घेता येईल. मनरेगा कर्मचारी आणि कृषी अधिकारी मार्गदर्शन करतील.
पुणे जिल्ह्यासाठी महत्त्वाची फळपिके
पीक.......लागवड अंतर (मी)...झाडे संख्या..अनुदान रक्कम
आंबा कलमे....१० x १०.........१००.........१६९६४०
डाळिंब कलमे....४.५ x ३........७४०.........२४७८९५
पेरू कलमे......६ x६...........२७७..........१४०४६८
सीताफळ कलमे....४ x ४........४००.........१४७५१२
केळी.........१.८ x १.५.....३७०४........२५३०३२
अंजीर कलमे......५ x ५.......४००..........१५१२४२
संत्रा/मोसंबी कलमे...६ x ६......२७७..........१६२१०३
शेवगा...........५x५...........४००........११२७३६
सागवान (साग)...२.४ x २.४...२५००..........११२७५०
गुलाब...........१.४x१.४.......३४५२......३४५२२०
मोगरा..........१.१x१.१........३४५४........२६३०००
सोनचाफा........३x३...........३४३.........२२३७२०
कागदी लिंबू रोपे...६x६........२७७.........१४९८३३
चिकू कलमे.......१०x१०.......१००..........१६६३०४
अव्हाकाडो........८x८...........१५०........१५२७८०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.