दिलासा देणारी पीक विमा योजना गुंडाळली

दिलासा देणारी पीक विमा योजना गुंडाळली

Published on

काटेवाडी, ता. २५ : महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक रुपयाची सर्वसमावेशक पीक विमा योजना गुंडाळली आहे. खरीप २०२५ आणि रब्बी २०२५-२६ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मंजुरी दिली आहे. याबाबत राज्य शासनाने मंगळवारी (ता २४) नव्याने अध्यादेश काढला. नव्या योजनेत ८०:११० ‘कप अँड कॅप’ मॉडेल अंतर्गत शेतकऱ्यांचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के निश्चित करण्यात आला आहे.
२०२३-२४ मध्ये १ रुपयामध्ये योजनेने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला होता. मात्र, या विमा योजनेवरून राज्यात काही ठिकाणी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि योजनेच्या आढाव्यानंतर शासनाने सुधारित योजना लागू केली आहे. नव्या योजनेत विमा हप्ता दर वाढले असून, केंद्र शासनाच्या सहा नोव्हेंबर २०२४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र आणि राज्य शासन अनुदान स्वरूपात उर्वरित हप्ता देतील. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार काहीसा वाढेल, परंतु नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांपासून संरक्षण आणि आर्थिक स्थैर्य राखण्याचे उद्दिष्ट कायम आहे.

योजनेची वैशिष्ट्ये
* जोखीम स्तर: सर्व पिकांसाठी ७० टक्के जोखीम स्तर निश्चित.
* विमा हप्ता अनुदान:
शेतकऱ्यांचा हिस्सा वगळता उर्वरित रक्कम center (कोरडवाहू पिकांसाठी ३० टक्के, बागायतीसाठी २५ टक्के) आणि राज्य शासनामार्फत अनुदान स्वरूपात दिली जाईल.
* ऐच्छिक सहभाग: कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक.
* भाडेकरार शेतकरी: नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणारे शेतकरी पात्र.
* उंबरठा उत्पादन: मागील सात वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या पाच वर्षांच्या सरासरीवर आधारित.


तांत्रिक प्रगतीचा वापर....
पीक कापणी प्रयोगांसाठी केंद्र शासनाच्या सीसीई अँपचा वापर बंधनकारक आहे. भात, सोयाबीन, कापूस आणि गहू पिकांसाठी ५० टक्के पारंपरिक आणि ५० टक्के तांत्रिक (रिमोट सेन्सिंग, ड्रोन, स्मार्टफोन) उत्पादनावर आधारित सरासरी उत्पादकता निश्चित केली जाईल.

शेतकऱ्यांसाठी सूचना....
योजनेत सहभागासाठी शेतकरी ओळखपत्र आणि ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंदणी अनिवार्य आहे. अवैध मार्गाने विमा काढल्यास अर्ज रद्द होईल. विमा कंपन्या ११० टक्के विमा हप्त्यापर्यंतचे दायित्व स्वीकारतील, तर त्यापुढील दायित्व राज्य शासनाकडे राहील. शेतकऱ्यांना विहित मुदतीत अर्ज करण्याचे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
-

भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेडमार्फत राबविलेली योजना
पीक..............विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर)..............शेतकऱ्यांचा हप्ता रुपयांत (टक्के)
भात (तांदूळ).............. ६१,०००.............. ६१० (१)
ज्वारी..............३३,०००.............. ८२.५० (०.२५)
बाजरी..............३२,०००..............१६० (०.५)
नाचणी..............२८,०००.............. ७० (०.२५)
भुईमूग..............४५,०००..............११२.५० (०.२५)
सोयाबीन..............५८,०००..............५८० (१)
मूग..............२७,०००..............६७.५० (०.२५)
उडीद.............. २५,००० ..............६२.५० (०.२५)
तूर..............४२,०००..............१०५ (०.२५)
कांदा..............६८,०००..............१७० (०.२५)
मका..............३६,००० ..............३६० (१)

26067

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com