आधुनिक शेती तंत्रज्ञानासाठी पिंपळीत विद्यार्थ्यांचा उपक्रम
काटेवाडी, ता. ३ : पिंपळी (ता. बारामती) येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त गुरुवारी (ता. ३) शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, बारामतीच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विशेष उपक्रम राबवला.
उपक्रमात विद्यार्थिनींनी शेतकऱ्यांना वसंतराव नाईक यांच्या जीवनशैलीची ओळख करून दिली. तत्पूर्वी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली. विद्यार्थिनींनी बीजप्रक्रिया, माती परीक्षण, हुमणी नियंत्रण, केळी लागवड तंत्रज्ञान आणि फळबाग लागवडीसाठी सीआरए तंत्रज्ञान यांवर सखोल चर्चा केली आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपकृषी अधिकारी मीरा राणे, सहायक कृषी अधिकारी सचिन खोमणे, उपसरपंच अजित थोरात, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पल्लवी देवकाते, डॉ. मयूर पिसाळ आणि प्रा. शिवानी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनी साक्षी जाधव, सुप्रिया कुंभार, श्रेया गावडे, श्रेया डांगे, राजलक्ष्मी पोरे, पायल सातकर आणि अंजली रेणुसे यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवला. गावातील शेतकरी मारुती बाबर, आनंदराव आगवणे, स्वप्नील देवकाते, अनिल बनकर, अश्विनी बससोडे, संतोष ढवाण, अशोक ढवाण यांच्यासह अन्य मान्यवरांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.