नत्र, पालाश युक्त खतेही वापरा

नत्र, पालाश युक्त खतेही वापरा

Published on

काटेवाडी, ता. १२: खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांनी पिकासाठी केवळ युरिया खत जास्त प्रमाणात वापरण्याऐवजी कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार नत्र, स्फुरद, पालाश युक्त खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.
युरिया खतासोबतच अन्य खताचा वापर केल्यास जेणेकरून पिकांना आवश्यकतेनुसार वाढीसाठी प्रमुख अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात वापर होईल. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून आवश्यकतेनुसार खतांचा वापर करावा. माती परीक्षण केल्याने खतांच्या मात्रेचा योग्य वापर करता येईल त्यामुळे खतांच्या खर्चात बचत होईल व उत्पन्न वाढीस मदत होईल. रासायनिक खतांच्या अतिवापराने होणारे शेतीचे नुकसान टाळता येईल. शेतकऱ्यांनी नेहमीच बियाणे, खते, औषधे खरेदी करताना विक्रेत्यांकडून पक्के बिल (एम फॉर्म) पावती घेऊन खरेदी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com