
काटेवाडी, ता. १८ : केंद्र सरकारच्या ‘नमो ड्रोन दीदी’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील महिला स्वयंसहायता गटांना शेतीसाठी ड्रोन उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. २०२४-२५ ते २०२५-२६ या कालावधीत निवडक ८८ महिला गटांना ड्रोनद्वारे द्रव खते आणि कीटकनाशकांची फवारणी करून शेतकऱ्यांना भाड्याने सेवा पुरवण्याची संधी मिळणार आहे. यामुळे महिला बचत गटांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत २०२४-२५ साठी ड्रोन खरेदीसाठी आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर (mahadbtmahait.gov.in) ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना कृषी विभागाच्या नोंदणी प्रक्रियेत समाविष्ट ड्रोन उत्पादकांकडून ड्रोन खरेदी करणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत ड्रोन आणि संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी ८० टक्के किंवा जास्तीत जास्त ८ लाख रुपये केंद्रीय अनुदान मिळेल. उर्वरित रक्कम ३ टक्के व्याजदराने कृषी पायाभूत सुविधा निधीतून कर्ज स्वरूपात घेता येईल.
प्रत्येक महिला स्वयंसहायता गटातील एका सदस्याला १५ दिवसांचे ड्रोन चालक प्रशिक्षण दिले जाईल, ज्यात शेतीसाठी कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांचा वापर यांचा समावेश आहे. इतर सदस्यांना ड्रोन सहाय्यक म्हणून विद्युत आणि यांत्रिक दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल.
हे आहे निवडीचे निकष
* गट निवड: १०-१५ गावांचा एक समूह निवडला जाईल.
* क्षेत्रफळ: कापूस, भात, ऊस, मिरची, गहू, फळबागा यांसारख्या पिकांचे १,०००-१,२०० हेक्टर क्षेत्र असावे.
* प्राधान्य: यशस्वी कस्टम हायरिंग केंद्रे, सक्षम शेतकरी उत्पादक कंपन्या, आणि जास्त सिंचनक्षमता असलेल्या भागांना प्राधान्य.
* नॅनो खतांचा वापर: नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी यांचा जास्त वापर होणाऱ्या क्षेत्रांना प्राधान्य.
अर्ज प्रक्रिया:
नोंदणी: संकेतस्थळावर स्वयंसहायता गटाची नोंदणी करा. यासाठी गटाचे नाव, बँक खाते तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.
दृष्टिक्षेपात
योजनेची निवड: संकेतस्थळावर ‘नमो ड्रोन दीदी’ योजना निवडा आणि अर्ज भरा.
कागदपत्रे: गटाची नोंदणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि शेतजमिनीचा तपशील यासारखी कागदपत्रे अपलोड करावी.
प्रस्ताव सादर करणे: अर्ज पूर्ण भरल्यानंतर तो ऑनलाइन पाठवा. अर्जाची छाननी कृषी विभागाकडून केली जाईल.
प्रशिक्षण आणि खरेदी: निवड झाल्यास, गटातील एका सदस्याला ड्रोन चालक प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल आणि नोंदणीकृत उत्पादकांकडून ड्रोन खरेदी करता येईल.
योजनेचे फायदे:
१. जिल्ह्यातील महिला बचत गटांना शाश्वत व्यवसाय
२. अतिरिक्त उत्पन्न कमविण्याची संधी,
३. शेतकऱ्यांना कमी खर्चात कार्यक्षम फवारणीची सेवा
४. पीक उत्पादन वाढेल आणि उत्पादन खर्च कमी होईल.
येथे साधा संपर्क
इच्छुकांनी आपल्या तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. अर्ज प्रक्रिया सुरू असून, अधिक तपशील mahadbmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
32451
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.