‘एआय’मुळे पशुपालन होणार सुलभ
काटेवाडी, ता. १८: शेतीला जोड देणारा पशुपालन हा व्यवसाय आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सुलभ आणि फायदेशीर होत आहे. देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालनातील सर्व कामे सुलभ करण्याचे तंत्रज्ञानवर काम चालू आहे . विविध प्रणालींचा वापर केल्याने पशुपालन व दुग्धव्यवसायामध्ये शास्त्रीय, डिजिटल दृष्ट्या कार्यक्षम बनेल, अशी माहिती कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी दिली.
कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने विकसित केलेल्या ‘फुले’ ॲप्सच्या मालिकेमुळे पशुपालकांना आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन करणे शक्य होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पशुपालनातील सर्व दैनंदिन कामे -जसे की जनावरांचे आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन नियोजन, आहार व्यवस्थापन, दूध उत्पादन व विक्री, आर्थिक नोंदी, तापमान-आर्द्रता निर्देशांक आधारित पशुसल्ला इत्यादी कामे सुलभ व अचूक पद्धतीने पार पाडण्यास मदत होते. सर्व माहिती डिजिटल स्वरूपात एकाच ठिकाणी सुरक्षितपणे संग्रहित केली जाते, ज्यामुळे कामाचा वेग व परिणामकारकता वाढते. त्यामुळे जनावरांचा ताण कमी होऊन जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन, व्यवस्थापन व नियोजन शास्त्रीयदृष्ट्या होवुन आर्थिक नफा मिळतो. या अॅप्समुळे पशुपालकांचे जीवन सुसह्य होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून आपला व्यवसाय अधिक यशस्वी करावा, असे आवाहन डॉ. माने यांनी केले आहे.
अॅप्समुळे हो हे फायदा
दैनंदिन कामांचे नियोजन
जनावरांचे आरोग्य
दूध उत्पादन आणि आर्थिक व्यवस्थापन
वेळ आणि खर्च वाचून उत्पादन वाढणार
पर्यावरणपूरक गोठा प्रणाली: फुले-प्रशांत
फुले-प्रशांत अॅप पशुपालकांना पर्यावरणपूरक गोठा व्यवस्थापनात मार्गदर्शन करते. हे अॅप स्वयंचलित तापमान आणि आर्द्रता नियंत्रणाद्वारे जनावरांचा उष्णता ताण कमी करते.
दैनंदिन कामांचे नियोजन: फुले-डेअरी पायलट
फुले-डेअरी पायलट'' अॅप पशुपालकांना २४ तासांच्या दैनंदिन कामांचे नियोजन करण्यास मदत करते. मोबाईल किंवा वेबवरून हे अॅप वापरून शेतकरी आपल्या कामांचे व्यवस्थापन सहज करू शकतात.
सर्वंकष माहिती: फुले डेअरी मार्गदर्शक
फुले डेअरी मार्गदर्शक'' हे अॅप पशुपालकांसाठी एक ज्ञानकोश आहे. यात जनावरांचे वजन, वय, प्रजनन व्यवस्थापन, आरोग्य, लसीकरण आणि जंतनाशकांचे वेळापत्रक यासारखी माहिती उपलब्ध आहे. याशिवाय, जातींनिहाय माहिती, डेअरी कॅलेंडर, चारा पेरणी आणि कापणी नियोजन, दूध गुणवत्ता चाचण्या, खर्च आणि नफा-तोटा अहवाल तसेच हवामान आधारित सल्ला मिळतो.
रिअल-टाइम डेटा: फुले ई-डेअरी फार्म
''फुले ई-डेअरी फार्म'' अॅप रिअल-टाइम डेटा आणि विश्लेषणाद्वारे शेतकऱ्यांना महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करते. यात पशुपालन आणि दुग्ध व्यवस्थापनाची नोंद ठेवता येते. शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि आर्थिक व्यवहार यांचा तपशील एकाच ठिकाणी मिळतो.
दूध गुणवत्तेची हमी: फुले डेअरी मॅन
फुले डेअरी मॅन'' अॅप ब्लू-टूथ आधारित मॉनिटरिंगद्वारे दुधाची पारदर्शकता, गुणवत्ता आणि उत्पत्ती निश्चित करते. हे अॅप ''फुले ई-डेअरी फार्म''शी जोडलेले आहे.
हवामान आधारित सल्ला: फुले अमृतकाळ
फुले अमृतकाळ'' अॅप तापमान आणि आर्द्रता निर्देशांकावर आधारित
पशुपालकांना सल्ला देते. यामुळे हवामानानुसार जनावरांचे व्यवस्थापन करणे सोपे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.