भूजल पातळी वाढल्याने मिटणार पाण्याची चिंता
काटेवाडी, ता. ८ : पुणे जिल्ह्यात मे २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि अटल भूजल योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भूजल पातळीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मागील पाच वर्षांच्या मे महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत यंदा पाणी पातळी सरासरी २.३२ मीटरने वाढली आहे. यामुळे शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण भागातील पाण्याची उपलब्धता वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याची चिंता काहीशी मिटणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अटल भूजल योजना ही केंद्र सरकारची भूजल व्यवस्थापनासाठीची महत्त्वाकांक्षी योजना आहे, ही योजना २०२० मध्ये सुरू झाली. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट भूजलाचा काटेकोर वापर, पुनर्भरण आणि स्थानिक समुदायांना सहभागी करून घेणे हा आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायती आणि शेतकरी गटांना प्रशिक्षण देऊन पाण्याचे नियोजन, जलसंधारण तंत्रांचा वापर आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यावर भर दिला जातो. जिल्ह्याची एकूण सरासरी पाणी पातळी मागील ५.५० मीटरवरून ३.१८ मीटरवर आली आहे.
रिचार्ज शाफ्ट, पाझर तलाव दुरुस्ती, आणि ड्रिप-स्प्रिंकलर यांसारख्या उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपून भूजल साठा वाढवण्यात यश मिळाले आहे. मे २०२५ मधील अतिवृष्टीमुळे रिचार्ज शाफ्टला विशेष फायदा झाला, ज्यामुळे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात झिरपले. ही योजना दीर्घकालीन दृष्टिकोनातून भूजल टिकवण्यासाठी आणि दुष्काळाशी सामना करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
भूजल पातळीची अशी झाली वाढ (मीटरमध्ये)
शिरूर .........४.३५
इंदापूर .........४.०४
बारामती .........३.६१
दौंड .........३.५६ मी
पुरंदर .........३.४४
मावळ .........०.४९
जुन्नर .........०.५६
योजने अंतर्गत २०२२ ते २०२४ मधील कामे:
रिचार्ज शाफ्ट आणि ट्रेंच: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने १,७६१ रिचार्ज शाफ्ट आणि ट्रेंच बांधले, ज्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत झिरपण्यास मदत झाली.
पाझर तलाव दुरुस्ती: लघु पाटबंधारे विभागाने १७२ पाझर तलावांचा गाळ काढून दुरुस्ती केली.
गेटेड सिमेंट नाला: मृदू व जलसंधारण विभागाने २४४ नाले बांधले, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय कमी झाला.
बंदिस्त पाइपलाइन: जलसंपदा विभागाने ३१ पाइपलाइन बांधल्या, ज्यामुळे पाण्याची गळती थांबली.
ड्रिप-स्प्रिंकलर: कृषी विभागाने १,२८६ हेक्टरवर ड्रिप आणि स्प्रिंकलर यंत्रणा बसवली, ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर झाला.
अटल भूजल योजनेच्या स्थानिक सहभागावर आधारित दृष्टिकोनामुळे आणि अतिवृष्टीच्या फायद्यामुळे भूजल पातळी सुधारली आहे. यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दीर्घकालीन फायदा होईल. ही योजना भविष्यात दुष्काळमुक्त आणि पाणी समृद्ध गाव घडवण्यासाठी महत्त्वाची ठरेल.
- दिवाकर धोटे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा
मे २०२५ मधील भूजल पातळीची मीटरमधील तुलना (तालुकानिहाय)
शिरूर:
विहिरींची संख्या............२५
मागील ५ वर्षे ............६.४९
मे २०२५ ............२.१४
झालेली वाढ............४.३५
इंदापूर:
विहिरींची संख्या............२०
मागील ५ वर्षे ............६.५१
मे २०२५ ............२.४७
झालेली वाढ............४.०४
बारामती
निरीक्षण विहिरींची संख्या............१२
मागील ५ वर्षे ............५.८०
मे २०२५ ............२.१९
झालेली वाढ............३.६१
दौंड
विहिरींची संख्या............१२
मागील ५ वर्षे ............ ५.७३
मे २०२५............२.१७
झालेली वाढ............३.५६
पुरंदर
विहिरींची संख्या............१५
मागील ५ वर्षे............७.०२
मे २०२५ ............ ३.५८
झालेली वाढ............ ३.४४
हवेली:
विहिरींची संख्या............१९
मागील ५ वर्षे............६.७६
मे २०२५ ........... ३.८३
झालेली वाढ ...........२.९३
मुळशी:
विहिरींची संख्या............११
मागील ५ वर्षे............३.७८
मे २०२५ ............१.३८
झालेली वाढ ...........२.४०
-------------------------
खेड
विहिरींची संख्या............१८
मागील ५ वर्षे............५.७०
मे २०२५ ............३.८५
झालेली वाढ ........... १.८५
वेल्हा
विहिरींची संख्या............६
मागील ५ वर्षे............४.११
मे २०२५ ............२.६२
झालेली वाढ ........... १.४९
आंबेगाव
विहिरींची संख्या............११
मागील ५ वर्षे............४.८४
मे २०२५ ............३.९१
झालेली वाढ ........... ०.९३
भोर:
विहिरींची संख्या............७
मागील ५ वर्षे............३.७३
मे २०२५ ............३ ३.१६
झालेली वाढ ........... ०.५७
जुन्नर
विहिरींची संख्या............२०
मागील ५ वर्षे............८.७८
मे २०२५ ............८.२२
झालेली वाढ ...........०.५६
मावळ
विहिरींची संख्या............१६
मागील ५ वर्षे............२.३१
मे २०२५ ............१.८२
झालेली वाढ ............४९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.