फळबाग लागवडीला बारामती उपविभागात गती

फळबाग लागवडीला बारामती उपविभागात गती

Published on

काटेवाडी, ता. ८ : बारामती उपविभागात २०२५-२६ या वर्षासाठी फळबाग लागवड योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. जवळपास २,०७० हेक्टर क्षेत्राचे लक्ष्य ठरवले असून, आतापर्यंत २,६७९ शेतकऱ्यांनी योजनेसाठी अर्ज केले आहेत. यापैकी १,९६१ शेतकऱ्यांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, १,५९८.९४ हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी टी.के. चौधरी यांनी दिली.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड तालुक्यांमध्ये ही फळबाग लागवड योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्यास मदत होत आहे. तसेच, स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि शाश्वत शेतीला चालना मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माहितीनुसार, या योजनेत शेतकऱ्यांना रोपे, खते आणि तांत्रिक मार्गदर्शन यासाठी अनुदान दिले जाते. याशिवाय, फळबाग लागवडीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन दिले जाते.


तालुकानिहाय प्रगती.....
बारामती : ५५५ हेक्टर लक्ष्यांपैकी ५८८ शेतकऱ्यांना ४७९ हेक्टरसाठी मंजुरी मिळाली आहे. यामध्ये ३०१ शेतकऱ्यांकडून २३५.१० हेक्टरवर लागवडीसाठी मंजुरी.
इंदापूर : ८५५ हेक्टर लक्ष्यांपैकी ५०१ शेतकऱ्यांना ४१९.४३ हेक्टरसाठी मंजुरी. केळी लागवडीसाठी ३४९ शेतकऱ्यांनी ३०५.१५ हेक्टर क्षेत्र मंजूर.
दौंड : ३०५ हेक्टर लक्ष्यांपैकी ३०७ शेतकऱ्यांना २६२.१० हेक्टरसाठी मंजुरी. आंबा लागवडीसाठी ८६ शेतकऱ्यांनी ९०.५० हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी मंजुरी.
पुरंदर : ३५५ हेक्टर लक्ष्यांपैकी ५६५ शेतकऱ्यांना ४३८.४१ हेक्टरसाठी मंजुरी. आंबा लागवडीसाठी ४१० शेतकऱ्यांनी ३२६.१६ हेक्टर क्षेत्र मंजूर.


पीकनिहाय तपशील
आंबा : ५४२ शेतकऱ्यांना ४६१.६१ हेक्टरवर लागवड मंजूर.
केळी : ७६६ शेतकऱ्यांना ६२३.९४ हेक्टरवर लागवड मंजूर.
अंजीर : ५६ शेतकऱ्यांना ३६.६० हेक्टरवर लागवड मंजूर.
इतर फळपिके : ५९७ शेतकऱ्यांना ४७६.७९ हेक्टरवर लागवड मंजूर.
बांबू : १८.७५ हेक्टरचे लक्ष्य असूनही कोणत्याही शेतकऱ्याने लागवड केलेली नाही.


शेतकऱ्यांचा या योजनेला मिळणारा प्रतिसाद कौतुकास्पद आहे. विशेषतः आंबा आणि केळी लागवडीला शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. यामुळे बारामती उपविभागातील शेती क्षेत्र अधिक समृद्ध होईल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल.
- टी.के. चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी


बारामती उपविभागात एकूण मिळाली मंजुरी (क्षेत्र हेक्टरमध्ये)
पीक..........लक्षांक..........लाभार्थी.........क्षेत्र
आंबा.........१६५.००.........५४२.........४६१.६१
केळी.........१४००.००.........७६६.........६२३.९४
अंजीर.........१०६.२५.........५६..........३६.६०
बांबू.........१८.७५.............०..........०.००
इतर फळपीके...३८०.००...........५९७.........४७६.७९
एकूण........२०७०.००.........१९६१........१८९८.९४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com