बारामतीतील शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे कलधोरणामुळे बाजारभावावर दबाव

बारामतीतील शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे कलधोरणामुळे बाजारभावावर दबाव

Published on

काटेवाडी, ता. २१ : यंदा मे आणि जून महिन्यांत बारामती तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने जिरायती शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे कल वाढला. खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये कडधान्य पेरणी क्षेत्रात ३२८.९० टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
बारामती तालुक्यात यंदा कडधान्य पेरणीने विक्रमी वाढ दाखवली आहे. सरासरी ४२० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १३८१.४० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात उडीद पिकाने १३८८.३७ टक्के वाढीसह ५९७ हेक्टर क्षेत्र व्यापले आहे. तुरीची पेरणी ३५२.४० हेक्टर (४७६.२२ टक्के वाढ), मूग ३२४ हेक्टर (१७५.१४ टक्के वाढ), तर इतर कडधान्य १०८.० हेक्टर (९१.५३ टक्के) पेरले गेले आहे. कमी कालावधीची आणि कमी पाण्याची गरज असलेली कडधान्य पिके जिरायती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरतात, असे निरीक्षण तालुका कृषी विभागाने नोंदवले आहे. बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सध्या उडीदाला सरासरी ६५९० रुपये प्रतिक्विंटल, तुरीला ५५०० रुपये आणि मूगाला ८००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. परंतु, परदेशातून स्वस्त कडधान्य आयात होत असल्याने हे दर कमी होण्याचा धोका आहे.

परदेशी कडधान्यांमुळे कमी बाजारभाव
केंद्र सरकारच्या तूर, उडीद आणि मसूर यांच्यावरील शून्य आयात शुल्क धोरणामुळे व परदेशी कडधान्यांच्या स्वस्त आयातीमुळे देशांतर्गत बाजारभाव कमी राहण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बारामती तालुक्यामध्ये यंदा मे व जून महिन्यामध्ये पावसाची स्थिती समाधानकारक राहिली होती. परिणामी कडधान्याच्या पेरण्यांमध्ये आपल्याला वाढ दिसून येते. कमी कालावधीत खात्रीशीर उत्पादन म्हणून शेतकऱ्यांनी कडधान्याची पेरणी केल्याचे दिसून येते.
- सचिन हाके, तालुका कृषी अधिकारी बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com