ॲग्रीस्टॅक पोर्टलवर करता येईना नोंदणी

ॲग्रीस्टॅक पोर्टलवर करता येईना नोंदणी

Published on

काटेवाडी, ता. ३ : केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी नोंदणीसाठी वापरला जाणारा डेटा कालबाह्य झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना डिजिटल शेतकरी ओळखपत्र मिळण्यात समस्या येत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वी जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे गट नंबर अद्याप जुन्या मालकांच्या नावे असल्याने त्यांना ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी करता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी, फसल बीमा योजना यासारख्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेता येत नसल्याची खंत जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करत आहेत.
केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅक योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी वापरला जाणारा डेटा हा साधारणपणे २०२१-२२ या कालावधीतील आहे. या डेटामध्ये अनेक ठिकाणी जमिनीच्या मालकी हस्तांतरणाची (फेरफार) माहिती अपडेट झालेली नाही. यामुळे नवीन जमीन मालकांचे गट नंबर जुन्या मालकांच्या नावाने दिसतात. हा डेटा आधार कार्ड, बँक खाते आणि सातबारा उताऱ्याशी जोडला गेल्याने, नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत आहेत. स्थानिक तलाठी आणि महसूल विभागाकडून फेरफार नोंदणी पूर्ण होऊनही ॲग्रीस्टॅक पोर्टलवर ही माहिती अद्ययावत न झाल्याने शेतकऱ्यांचा खोळंबा होत आहे. विशेषतः ज्यांनी दोन तीन वर्षांपूर्वी जमीन खरेदी केली आहे, त्यांना ही समस्या भेडसावत आहे.

गोजूबावी येथे दोन वर्षांपूर्वी शेती विकत घेतली आहे. शेतीमध्ये मला आता फळबाग लागवड करायची आहे. मात्र ॲग्रीस्टॅक वरील सध्या माझ्या मालकीच्या असलेल्या शेतीचा गट क्रमांक हा जुन्या मालकाच्या नावे दाखवला जात असल्याने मला फार्मर आयडी मिळत नाही. याबाबत कृषी व महसूल विभागाकडे विचारणा केली असता डेटा अपडेट करण्याचे काम आमच्याकडे नाही असे त्यांनी सांगितले.
- प्रदीप शिंदे, शेतकरी, गोजुबावी (ता. बारामती )

ॲग्रीस्टॅकवरील डेटा हा केंद्र सरकारच्या डिजिटल डेटाबेसवर अवलंबून आहे. स्थानिक पातळीवर फेरफार नोंदणी झाली तरी ती केंद्रीय डेटाबेसमध्ये अपडेट झाल्याशिवाय या शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकत नाही. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे. जेव्हा हा डेटा अपडेट होईल तेव्हा या शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकेल.
- चेतन महानवर, नेटवर्क इंजिनियर, महसूल विभाग बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com