जळोचीत टोमॅटोच्या भावास ‘आग’

जळोचीत टोमॅटोच्या भावास ‘आग’

Published on

काटेवाडी, ता. ३ : जळोची (ता. बारामती) उपबाजारात बुधवारी (ता. ३) टोमॅटोची सरासरी किंमत १५०० रुपये प्रतिक्विंटल नोंदवली गेली. बाजारभावात घट झाल्याने उत्पादकांच्या पदरी निराशा पडली.
पुणे बाजारात मागील सप्ताहातील सरासरी किंमत १६५८ रुपये प्रतिक्विंटल होती. ती मागील आठवड्याच्या तुलनेत ३४ टक्के कमी झाली आहे. देशपातळीवर टोमॅटोच्या आवकेमध्ये ३१.३ टक्के घट झाल्याने पुरवठा कमी झाला आहे, अशी माहिती कृषी विभागाअंतर्गत स्मार्ट प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण कक्षाने दिली.

जळोची उपबाजारातील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १४०४.५० क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. यामध्ये कांदा (४८३ क्विंटल), बटाटा (३८० क्विंटल), लसूण (९० क्विंटल), कोथिंबीर (८७ क्विंटल) आणि मेथी (४५ क्विंटल) यांचा समावेश होता. डाळिंबाला सर्वाधिक दर मिळाला, जो प्रतिकिलो १५० रुपये इतका होता. मागील सप्ताहातील टोमॅटोच्या निवडक बाजारातील सरासरी किमती पाहता,मुंबईत सर्वाधिक २६१७ रुपये प्रतिक्विंटल, तर संगमनेरमध्ये सर्वात कमी १०८३ रुपये प्रतिक्विंटल होत्या. याशिवाय नारायणगावमध्ये १६०० रुपये, सोलापूरमध्ये १२२५ रुपये आणि पुण्यात १६५८ रुपये प्रती क्विंटल सरासरी किमती नोंदवल्या गेल्या. दरम्यान, डाळिंबालाही उच्चांकी १५ हजार प्रतिक्विंटल बाजारभावात मिळाला.


प्रमुख भाजीपाल्यांचे किमान-कमाल बाजारभाव (प्रतिक्विंटल, रुपयांत)
पीक.........किमान............कमाल
आद्रक............२५००............ कमाल............ ६०००
काकडी............१०००............ २०००
कारले............ १०००............३०००
कांदा............ ३०० ............ १५५१
गवार/पुणेरी............ ३०००............६०००
गाजर............ १५००............ ३५००
टमाटे............ १०००............ २०००
डाळींब ............ ३०००............ १५०००
दोडका............१५००............४०००
पपई............ १०००............ २५००
बटाटे............ १५००............ १८००
भेंडी............ १३००............ ३०००
मोसंबी............ २०००............४०००
लसूण............ २५००............ ७०००
वांगे............ १५००............ ४०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com