काटेवाडी शाळेत शिक्षक दिन साजरा
काटेवाडी, ता. ४ ः काटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गुरुवारी (ता. ४) शिक्षक दिन साजरा झाला. शुक्रवारी (ता. ५) ईद-ए-मिलाद, शनिवारी गणेश विसर्जन आणि रविवारी सुट्टी असल्याने आजच हा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून दिवसभर अध्यापनाचा अनुभव घेतला. शिक्षकांनीही यानिमित्ताने आपल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले नागरिक बनण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन त्यांचे आभार मानले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ काटे, केंद्रप्रमुख शफिया तांबोळी, मुख्याध्यापिका राणी ढमे, शिक्षक नर्मदा शिंदे, गीतांजली देवकर, जयश्री चांगण, संतोष सातपुते, बापू तांदळे, लीना दळवी आणि वनिता जाधव उपस्थित होते.