तृणधान्य वाढीसाठी मिळणार प्रशिक्षण
काटेवाडी, ता. ४ : रब्बी हंगाम २०२५-२६ मध्ये शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने पीक प्रात्यक्षिक कार्यक्रमाची दारे खुली केली आहेत. गहू, कडधान्य, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्यांची उत्पादकता वाढविण्यसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित बियाण्यांचा लाभ शेतकरी गटांना प्रशिक्षण मिळणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान, अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत गहू, कडधान्य, ऊस, करडई, मोहरी आणि सूर्यफूल पिकांसाठी प्रात्यक्षिके राबवली जाणार आहेत. महाराष्ट्र कृषी विभागाच्या माहितीनुसार, या योजनेमुळे पिकांचे उत्पादन २०-३०% वाढण्याची शक्यता आहे. ३१ मार्च २०२४ पूर्वी नोंदणीकृत शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकारी संस्थांना सहभागाची संधी आहे. निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यतत्त्वावर होईल. ही योजना शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक प्रगतीच नव्हे, तर बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढवण्याची संधी देणारी आहे. यंदा तेलबियांवर विशेष लक्ष केंद्रित करून आयात कमी करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in) वर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” पर्यायाखाली अर्ज करा.
अट: अर्जदार आणि गट सदस्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अधिकाधिक शेतकरी गटांनी या योजनेत सहभागी व्हावे. तेलबिया शेतीमध्ये असणाऱ्या संधी आणि आव्हाने याची देखील या प्रशिक्षण कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती होईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे यांनी सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.