बारामती कृषी बाजार समितीच्या नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी

बारामती कृषी बाजार समितीच्या नामकरणाच्या प्रस्तावास मंजुरी

Published on

काटेवाडी, ता. १२ : माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीला श्रद्धांजली म्हणून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे नामकरण ‘अजितदादा पवार कृषी उत्पन्न बाजार समिती, बारामती’ असे करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाला आहे. हा निर्णय बुधवारी (ता. ११) झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

सभेच्या सुरुवातीला सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, कर्मचारी आणि शेतकरी-व्यापारी-हमाल-मापाडी यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. पवार यांनी बारामती बाजार समितीच्या कामकाजात, विस्तारात आणि विकासात मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या सहकार्यामुळे आणि आर्थिक मदतीमुळे बाजार समिती आवारात विविध सोयी-सुविधा आणि उपक्रम उभारले गेले. यामुळेच बारामती बाजार समितीला महाराष्ट्रात नावलौकिक मिळाला, अशा भावना यावेळी संचालक मंडळाकडून व्यक्त करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर सभापती विनायक गावडे यांनी नामकरणाचा प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव आता महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक, पुणे यांच्यामार्फत शासनाकडे सादर करणार आहे. शासनाकडून आवश्यक कार्यवाही करून राजपत्र अधिसूचना (गॅझेट) प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. पवार यांच्या दूरदृष्टीमुळे बारामतीतील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फायदा झाला असून, हे नामकरण त्यांच्या कार्याला सलाम ठरेल, असे मत संचालक मंडळातील सदस्यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com