बारामतीत विद्यार्थ्यांचे
गुलाब पुष्प देत स्वागत

बारामतीत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देत स्वागत

Published on

काटेवाडी, ता. २२ : पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (ता. २२) बारामती तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडली. शिक्षण सहसंचालक राजेश क्षीरसागर यांनी तालुक्यातील पाच विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेची पाहणी केली, तसेच परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करत त्यांचा उत्साह वाढवला. त्यांच्यासोबत गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी उपस्थित होते.
बारामती तालुक्यात पाचवी आणि आठवी मिळून एकूण ५२३४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५१४३ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते, तर ९१ विद्यार्थी गैरहजर राहिले. एकूण उपस्थितीचे प्रमाण ९८.२६ टक्के इतके राहिले. पाचवीच्या २१ केंद्रांवर एकूण ३१८२ विद्यार्थ्यांपैकी ३११६ विद्यार्थी उपस्थित (९७.९२ टक्के), तर ६६ विद्यार्थी गैरहजर होते. आठवीच्या ११ केंद्रांवर २०५२ विद्यार्थ्यांपैकी २०२७ विद्यार्थी हजर (९८.७८ टक्के) होते, तर केवळ २५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com