महाराजस्व अभियानाचा लाभ घ्या : रावडे

महाराजस्व अभियानाचा लाभ घ्या : रावडे
Published on

बारामती/काटेवाडी, ता. ५ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानास काटेवाडी येथून सात मार्च रोजी प्रारंभ करण्यात येणार आहे, या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केले आहे.
महसूल व वन विभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यातबाबत मंजुरी दिलेली आहे. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी अभियानाचा टप्पा क्रमांक एक बारामती व इंदापूर तालुक्यात राबविण्याबाबत कविवर्य मोरोपंत नाट्यगृह बारामती येथे सभा घेऊन मार्गदर्शन केले.

यावेळी बारामती व इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, गट विकास अधिकारी, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिनी प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करणेसाठी मंडळ स्तरावर समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.


अभियान टप्पा क्र.१ चे वेळापत्रक.....
काटेवाडी येथून ७ मार्च रोजी प्रांरभ होणार असून शिर्सुफळ येथे १४ मार्च, करंजेपूल २० मार्च, पणदरे २७, वडगाव निंबाळकर ३ एप्रिल, मोरगाव १० एप्रिल, लोणीभापकर १७ एप्रिल, सुपा २४ एप्रिल, बारामती ८ मे, माळेगाव बु.१५ मे आणि उंडवडी क.प.२२ मे रोजी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com