प्रति पंढरपूर श्री विठ्ठल बन डाळींब

प्रति पंढरपूर श्री विठ्ठल बन डाळींब

डाळिंब (ता. दौंड) हे एक पवित्र स्थान असल्याची विठ्ठल भक्तांची धारणा आहे. येथील पुरातन विठ्ठल मंदिराचा काही वर्षांपूर्वी जिर्णोद्धार करण्यात आला आहे. डाळिंब बन (ता. दौंड) येथील श्री विठ्ठल देवस्थान हे प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे. पुरंदर, हवेली आणि दौंड अशा तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागात हे स्थान आहे. त्यामुळे या प्रति पंढरपूर तीर्थस्थळी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते.


दरवर्षी देवस्थान समितीच्या वतीने श्री विठ्ठल मंदिर व परिसरात भव्य मंडप उभारून आकर्षित विद्युत रोषणाई केली जाते. आषाढी एकादशीनिमित्त पुणे जिल्ह्यातील वारकरी संप्रदायाचे भाविक भक्त मोठ्या संख्येने श्री विठ्ठलाच्या देवदर्शनासाठी येत असतात. डाळिंब गाव ते श्री विठ्ठल मंदिर बन दरम्यान पालखी मिरवणूक असते. विविध गावातील सांप्रदायिक भजनी मंडळांची भजनमाला आयोजित करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या प्रसिद्ध ढोल ताशा पथकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.

आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल बन येथे पुरंदर, हवेली आणि दौंड तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे भाविक नागरिक मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी भाविक भक्तांकडून साक्षात पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडल्याचे समाधान व्यक्त केले जाते.
स्वयंभू आमुचा विटेवरी उभा। चैत्यन्याचा गाभा पांडुरंग।।
या भावनेने भक्त येथे येत असतात. डाळिंब गावातील समस्त ग्रामस्थ, युवा, तरुण मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होत असतात. येथे विविध सामाजिक - सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात.

सौजन्य
उद्योजक सागर म्हस्के
शांताई प्रॉपर्टीज
मून वॉटर ॲग्रो फार्म

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com