खडकवासलाच्या पाण्यासाठीचा संघर्ष आता टळणार

खडकवासलाच्या पाण्यासाठीचा संघर्ष आता टळणार
Published on

खुटबाव, ता. २७ : खडकवासला फुरसुंगी बोगद्याला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने पुणे शहर व ग्रामीणचा खडकवासला प्रकल्पातील पाण्यासाठी होणारा संघर्ष आता टळणार आहे. कालव्याद्वारे आलेल्या पाण्याचा अपव्यय व चोरी व्हायची. बंदनळी प्रकल्पामुळे या गोष्टीला आळा बसणार आहे. हे पाणी पुण्याबाहेर काढताना अडीच टीएमसी पाण्याचा अपव्यय व्हायचा. तो थांबणार आहे. यामुळे हवेली, दौंड, इंदापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रकल्पाचे स्वागत केले आहे.

खडकवासला धरणसाठा साखळीतील साठवण पाणी क्षमता ३१ टीएमसी असून, उपयुक्त पाणी क्षमता २९.१५ टीएमसी आहे. पुणे शहराच्या पिण्यासाठी व वापरासाठी पाणी वापर होऊन हे पाणी हवेली, दौंड व इंदापूरच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पुणे शहरातून कालव्यादरे आणले जायचे. त्याचा बऱ्याच वेळ अपव्यय व्हायचा. आता बंदनळी प्रकल्पामुळे या गोष्टीला आळा बसणार आहे. या प्रकल्पामुळे हे पाणी आता शेतीसाठी मिळण्यास मदत होणार आहे. अनेकदा उन्हाळ्यामध्ये पुणे शहर व ग्रामीण शेतकरी यांच्यामध्ये खडकवासला प्रकल्पातील पाण्यावरून वाद व्हायचे. कालवा सल्लागार समिती बैठकीमध्ये अनेकदा खडाजंगी व्हायची. खडकवासला प्रकल्पाच्या पाण्यावरून खडकवासला प्रकल्प कार्यकारी अभियंता यांना अनेकदा रोषाला सामने जावे लागायचे. तसेच या प्रकल्पासाठी अडकलेली शहरी भागातील १२ हजार कोटी रुपयांची जमीन प्रशासनाला अन्य सार्वजनिक कामासाठी वापरणे शक्य होणार आहे. एकूणच पुणे शहर व पुणे ग्रामीण मधील शेतकरी यांच्यासाठी हा प्रकल्प बहुआयामी ठरणार आहे.

जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बंद नळीतून खडकवासला ते फुरसुंगी हे पाणी यावे यासाठी पाठपुरावा केला. या संदर्भात अनेक अडथळे आले. अखेर प्रकल्पाला मंजुरी मिळाली. दौंड, इंदापूर व‌ हवेलीतील शेतकऱ्यांच्या दृष्टीने जीवनवाहिनी ठरणाऱ्या या प्रकल्पामुळे अडीच टीएमसी पाणी वाचणार असल्याचे समाधान आहे. भविष्यामध्ये मुळशी धरणाचे पाणी पूर्वेकडे वळवून आगामी १०० वर्षाचे पाण्याचे नियोजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची मागणी
हा प्रकल्प मंजूर होण्यासाठी जवळपास एक वर्ष कालावधी लागला. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आगामी तीन वर्षे लागतील असे प्रशासनाने सांगितले आहे. परंतु प्रत्यक्षात प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी अनेक अडथळे आहेत. यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन प्रकल्प पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com