

खुटबाव, ता. ७ : पिंपळाची वाडी खोर (ता. दौंड) येथे गुरुवारपासून (ता. ९) दौंड तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा व दौंड मल्ल सम्राट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीने व दौंड तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या मान्यतेने आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक ज्ञानेश्वर चौधरी व सागर चौधरी यांनी दिली. महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा या गट ८६ किलो ते १२५ किलो वजन गटामध्ये पार पडल्या जाणार आहेत. वजन गट २५, २८, ३२, ३६, ४०, ४४, ४८, ५१, ५५, ६० किलो मधील बाल गटाच्या कुस्त्या या फक्त पुणे जिल्हा स्तरापर्यंत होणार आहेत. वजन गट ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२ या वजन गटांमधील कुस्ती स्पर्धा महाराष्ट्र केसरी वरिष्ठ वजन गट गादी व माती विभागावरील पार पडणार आहेत. या स्पर्धेला दौंडचे आमदार राहुल कुल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान मेघराज कटके, हिंद केसरी व महाराष्ट्र पैलवान अभिजित कटके उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.