दौंडमधील गुऱ्हाळ उद्योगावर ऊस दराची हनुमान उडी
खुटबाव, ता. २५ : दौंड तालुक्यातील पूर्ण क्षमतेने सुरू असणाऱ्या ४०० गुऱ्हाळ घरांसाठी ऊस दराने हनुमान उडी घेतली आहे. पारगाव येथील दशरथ बोत्रे या शेतकऱ्याच्या चार एकर क्षेत्रातील ऊस ३५०० रुपये प्रतिटनाने एका गुऱ्हाळ चालकाने खरेदी केली आहे.
दौंडसह इतर जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीस गुऱ्हाळ घरासाठी सुमारे प्रतिटन २६०० रुपये बाजारभाव होता. याचवेळी तालुक्यातील कारखान्यांनी २८०० रुपये प्रतिटन उसाचा पहिला हप्ता काढला. फेब्रुवारी महिनाअखेर उसाची कमतरता जाणवू लागली. त्यामुळे तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपल्यातच जमा आहे. अवघ्या दीड महिन्यामध्ये गुऱ्हाळ घरामध्ये प्रतिटन ९०० रुपये बाजारभाव वाढला. यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
यामुळे वाढतो बाजारभाव
१. मकर संक्रांतीनंतर हळूहळू ऊन वाढीस लागते
२. ऊस तोडणी कामगारांवर उन्हाचा परिणाम
३. हळूहळू ऊस तोडणीचे प्रमाण होते कमी
४. ऊस संपण्याच्या मार्गावर असल्यामुळे गुऱ्हाळ चालकांची धावाधाव
५. गुऱ्हाळ चालकांच्या स्पर्धेत उसाला अधिक भाव मिळतो
दौंड तालुक्यात शिल्लक असलेल्या उसाबाबत दौंड शुगर कारखान्याने सर्वे केला. यामध्ये अजूनही तालुक्यात दीड लाख टन ऊस गाळपासाठी शिल्लक आहे. गुऱ्हाळ घराला चांगला बाजार बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपला ऊस राखीव ठेवला आहे. त्यामुळे शिल्लक उसाला भविष्यात वाढलेला बाजारभाव कायमस्वरूपी टिकणार का? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
- वीरधवल जगदाळे, संचालक दौंड शुगर
फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत दरवर्षी गुऱ्हाळ व्यवसायाला उसाची कमतरता जाणवते. यावेळी नफ्याकडे लक्ष न देता फक्त व्यवसाय चालवा म्हणून अनेक गुऱ्हाळ चालकांमध्ये ऊस दराची स्पर्धा असते. वाळकी येथे संजय थोरात यांचा १० एकर ऊस ३३५० रुपये बाजारभावाने खरेदी केला आहे.
- सोमनाथ ताकवणे, गुऱ्हाळ चालक
92903
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

