एकेरवाडीत तरकारी पिकांमुळे अवतरली आर्थिक सुबत्ता

एकेरवाडीत तरकारी पिकांमुळे अवतरली आर्थिक सुबत्ता
Published on

खुटबाव, ता. ३० : एकेरवाडी (ता. दौंड) येथे तरकारी पिकाच्या जोरावर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचे प्रशस्त घर, चार चाकी गाड्या व मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत राहणीमानाचा दर्जा उंचावला आहे. विशेष म्हणजे तरकारी पिकामुळे एकेरीवाडीच्या अर्थकारणास वेग आला आहे. तरकारी पिकामुळे एकेरवाडीचे अर्थकारण बदलले असून, गावामध्ये शेतजमिनीला प्रतिएकर ५० लाख रुपये बाजारभाव मिळत आहे.


एकेरवाडी हे २५०० लोकसंख्येचे गाव. गावातील सर्व शेतकऱ्यांना मिळून जेमतेम १५०० एकर जमीन आहे. पूर्वी या गावांमध्ये ऊस हे हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक घेतले जायचे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस गावातील उच्चशिक्षित युवकांनी बदल म्हणून तरकारी पीक घेण्याचे ठरवले. आज गावांमधून दररोज २० टन तरकारी‌ माल मांजरी येथील बाजारपेठेत दररोज विकण्यासाठी जात आहेत. यामुळे एकेरीवाडी हे तरकारीचे गाव बनले आहे.

सुरुवातीस गावातील रामकृष्ण शेळके व रामकृष्ण टुले यांनी बदल म्हणून उसामध्ये काकडी लावण्यास सुरुवात केली. पहिल्याच प्रयत्नात चांगले पैसे मिळाल्याने संपूर्ण गावभर काकडी पिकाचा गवगवा झाला. त्यानंतर गावातील इतर शेतकऱ्यांनी तरकारीचे पीक घेण्यास सुरुवात केली. ऊस पिक घेतल्यानंतर १८ महिन्यांनी शेतकऱ्यांना पैसे मिळतात. परंतु तरकारीचे पीक घेतल्यानंतर दररोज ताजा पैसा शेतकऱ्यांच्या घरामध्ये खळखळू लागला.
पिकाला बाजारपेठ मिळावी म्हणून गावातील मल्हारी थोरात (१), विजय जगताप(२) व परशुराम पडळकर (२) यांनी पिकअप वाहन खरेदी केले. गावामध्ये दररोज सकाळी तोडलेला भाजीपाला क्रेटमध्ये भरून मांजरी येथील बाजारपेठेमध्ये विकला जाऊ लागला. विशेष म्हणजे स्वतःच्या तरकारी माला सोबत शेतकरी ३६५ दिवस स्वतः बाजारपेठेत उपस्थित राहायचे. त्यामुळे बाजारपेठेमध्ये कोणता तरकारी मालाचे पीक कधी घ्यायचे? याचे ज्ञान प्राप्त झाले. हळूहळू तरकारीची शेती वाढू लागली.

एकेरीवाडी येथे पिकवली जाणारी तरकारी पिके
काकडी, वांगी, गवार, भेंडी, दुधी भोपळा, कोबी, फ्लॉवर, दोडका, घोसावळे, कारले ,बीट, मिरची, कोथिंबीर, मेथी,पालक,आले.


सचिन टुले ( शेतकरी) एकेरीवाडी प्रत्येक शेतकरी दिवसभर शेतीमध्ये राबत असतो. अलीकडील काळामध्ये तरकारी बरोबरच काही शेतकऱ्यांनी केळी, पपई, कलिंगड, खरबूज ही पिके घेण्यास सुरुवात केली आहे. येथील शेतकरी काळानुरूप बदलत असल्याने प्रत्येक कुटुंबामध्ये आर्थिक सुबत्ता आली आहे.

02287, 02288

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com