तरुणांनी व्यसनापासून अलिप्त रहावे : भागवत रहावे : ॲड. भागवत
खुटबाव, ता. १३ : लडकतवाडी (ता. दौंड) येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त व्याख्याते ॲड. बापूराव भागवत यांचे व्याख्यान झाले.
भागवत म्हणाले की, ‘‘पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करत महात्मा फुले यांनी स्री शिक्षणाची कवाडे खुली केली. याची परिणिती म्हणून आज महिला समाजामध्ये वेगवेगळ्या स्थानावरती विराजमान आहेत. फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च करताना महिला, मुली, विधवा, शेतकरी, सामाजिक, मागासवर्गीय घटकांसाठी वेचले. तरुणांनी व्यसनापासून अलिप्त रहावे,’’ असा सल्ला भागवत यांनी दिला.
यावेळी कैलास बधे, परमेश्वर लडकत, विलास होले, दत्तात्रेय वाघमोडे, सोमनाथ लडकत, अजिंक्य लडकत, शुभम लडकत, मनोहर जाधव, डॉ. पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शांताराम टिळेकर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

