दौंडमध्ये पावसामुळे खोळंबल्या ऊस लागवडी

दौंडमध्ये पावसामुळे  खोळंबल्या ऊस लागवडी
Published on

खुटबाव, ता. २४ : दौंड तालुक्यात सलग आठ दिवस झालेल्या मॉन्सून पूर्व पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मे व जून महिन्यामध्ये दरवर्षी हजारो एकर उसाचे लागवड होते. या सर्व लागवडी सलग पावसामुळे खोळंबल्या आहेत. शुक्रवारपासून (ता. १६) सुरू झालेला पाऊस आजतागायत दररोज पडत आहे.
पावसामुळे मोठ्या पिकांना फायदा झाला आहे. विशेषतः तोडणीस आलेल्या उसाच्या प्रत्येक रोपाच्या मुळाशी पाणी गेल्याने सरासरी ऊस उत्पादन वाढणार आहे. परंतु या पावसाने अनेक शेतीची कामे खोळंबली असल्याची वस्तुस्थिती आहे. विशेषतः अनेक शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडीसाठी शेतीची नांगरट केली आहे. परंतु सलग पाऊस असल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक पशुपालक शेतकरी चढ्या भावाने उसाचे वाढे खरेदी करत आहेत. दौंड तालुक्यातील अनेक गुराळ उद्योग ठप्प झाले आहेत. या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी विवाहाचा मुहूर्त असल्याने अनेक विवाह भर पावसात संपन्न झाल्याची वस्तुस्थिती आहे. पावसाच्या शक्यतेमुळे अनेक वरपित्यांनी लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा थोडक्यात आटोपल्या आहेत.


सर्वाधिक पावसाची बातमी हवामान खात्याने केले होते. हंगाम पूर्व पाऊस झाल्याने शेतकरी वर्गामध्ये सुरुवातीला समाधानाचे वातावरण होते. आता शेतीची कामे खोळंबल्याने शेतकरी पाऊस थांबण्याची वाट पाहत आहे. आगामी मॉन्सून आगमनापूर्वी सर्व कामे उरकण्यासाठी शेतकरी पावसाच्या विश्रांतीची आतुरतेने वाट पाहत आहे.
- पोपटराव लव्हटे, शेतकरी


02454

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com